
१. आश्रमात होत असलेले उत्तम आणि शिस्तबद्ध कार्य
‘वर्ष १९९९ पासून मी सनातन संस्थेच्या कार्याबद्दल ऐकत होते आणि सनातनचे साधक पहात होते. प्रतिवर्षी साधिका सौ. सुचेता महाजन यांच्याकडून मला ‘सनातन पंचांग’ मिळते. ‘सनातन काय कार्य करत आहे’, हे रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. ‘आश्रमातील साधकांचे अतिशय पवित्र विचार, आचार आणि उच्चार ’, हे सर्व अध्यात्माला धरून आहे. साधकांचे गोड बोलणे, त्यांनी शांतपणे समजावून सांगणे, अन्नपूर्णा कक्ष, धान्य साठवण्याची जागा, साधकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी लावलेली ‘लेबल्स’, असा उत्तम आणि शिस्तबद्ध कार्याचा आदर्श नमुना आहे.
२. साधकांमधील सेवाभाव
विविध क्षेत्रांत सेवा करणारे साधक आपापल्या सेवांत मग्न होते. कुठेही गडबड किंवा गोंधळ नव्हता. प्रत्येक साधकात सेवाभाव दिसून येत होता.
३. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका, देवतांची चित्रे, श्री दुर्गामातेची मूर्ती, पंचमुखी मारुतीची मूर्ती यांच्या समोर बसून शांतपणे नामजप करणारे साधक पाहून माझे मन अंतर्मुख झाले.
४. आश्रमातील महाप्रसाद
आश्रमातील सात्त्विक महाप्रसाद रुचकर तर आहेच आणि तो महाप्रसाद ग्रहण करणार्याची सात्त्विकता वृद्धिंगत करणाराही आहे.
५. आश्रमाच्या पवित्र वास्तूत प्रवेश करतांना स्वतःवर तुलसीजल शिंपडण्यापासून हिंदु धर्माच्या उदात्त विचारांची महानता प्रत्येकाच्या मनावर ठसण्यास आरंभ होतो.
६. सनातन संस्थेच्या कार्याची भव्यता आणि दिव्यता लक्षात येणे
हिंदु समाजावरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे ‘यू ट्यूब चॅनेल’, चित्रीकरण कक्षातील छायाचित्रक (कॅमेरे), ते हाताळण्याचे अप्रतिम कौशल्य असलेले साधक पाहून कौतुक वाटले. आश्रमात चालू असलेल्या सेवा पाहून सनातन संस्थेच्या कार्याची भव्यता आणि दिव्यता लक्षात आली.’
– सौ. अनुष्का आशिष गणपुले, तारळे, जिल्हा सातारा. (३.३.२०२६)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !