‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरात मला जाणवलेली सूत्रे आणि माझ्यात झालेला पालट अन् आलेली अनुभूती येथे दिली आहे.

१. जाणवलेली सूत्रे

अ. ‘मला शिबिरात सहभागी होण्याची संधी केवळ गुरुकृपेमुळेच मिळाली’, असे वाटले.
आ. शिबिरात मला सतत अंतर्मुख रहाता येत होते. माझे स्वतःचे निरीक्षण मला करता येत होते.
इ. शिबिरात मला ‘सेवा करतांना मी कुठे न्यून पडते ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘एखादा प्रसंग घडला, तर त्यात कोणता दृष्टीकोन ठेवायचा ?’, हे मला समजले. ‘आतापर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी त्यावर प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी मला प्रेरणा मिळाली.
ई. ‘या शिबिरातून साधना कशी करावी ?’, हे मी शिकले. ‘साधना करतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे किती महत्त्वाचे आहे’, हे माझ्या लक्षात आले.
उ. प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) साक्षात विष्णुस्वरूप आहेत. ‘हिंदु धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः त्रास सोसून जे योगदान दिले आहे, ते पाहून आपण खरोखर भाग्यवान आहोत’, असे मला वाटले.
ऊ. ‘प.पू. गुरुदेव गुरुकृपायोगाच्या माध्यमातून कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग यांद्वारे आमच्याकडून सर्वोत्तम साधना करून घेत आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
ए. ‘मर्यादित वेळेत नम्रपणे विषय कसा मांडावा ?’, याविषयी मला शिबिरात शिकायला मिळाले.
ऐ. माझे लक्ष आधी केवळ कार्याकडे अधिक होते. ‘आता प्रत्येक कृती ‘साधना’ म्हणून कशी करावी ?’, याविषयी माझ्या लक्षात आले.
ओ. माझे स्वभावदोष माझ्या लक्षात आले. ‘माझे स्वभावदोष दूर करण्यासाठी गुरुदेवांनीच माझ्याकडून अपेक्षित प्रयत्न करून घ्यावेत’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.
२. मला शिबिरात पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.
३. जाणवलेला पालट
मला पूर्वी सत्संगात नीट बोलता येत नव्हते. मला आता सत्संगात व्यवस्थित बोलता येते.
४. प्रार्थना आणि कृतज्ञता
दक्षिण कन्नड येथील सत्संगांची संख्या वाढवण्यासाठी आणि धर्मशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी हे प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आम्हाला या शिबिरात उपस्थित रहाण्याची संधी दिल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती वीणा गौडा, दक्षिण कन्नड (१.३.२०२६)
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !