‘मी एप्रिल २०२६ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. एरव्ही मला रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे मी अस्वस्थ असते. मला प्रसाधनगृहात जाण्यासाठी रात्री किमान २ वेळा तरी उठावे लागते; मात्र आश्रमात मला अगदी शांत झोप लागली. मला रात्री झोपायला उशीर होत असला, तरीही प्रतिदिन सकाळी मला ताजेतवाने जाणवत होते.

२. या आधी मी इतरांशी अधिक बोलत नव्हते किंवा स्वकोषात रहात होते. या वेळी मी सर्वांशी स्वतःहून बोलत होते. मी इतरांना साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारत होते.
३. सहसाधिकांनी मला खोलीची, तसेच प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्याविषयी विचारल्यावर ते मी आनंदाने स्वीकारून तशी कृती केली.
४. मी घरी असतांना पादत्राणे (स्लिपर) न घालता चालल्यास मला पुष्कळ त्रास होतो. माझी पाऊले दुखतात; मात्र मी आश्रमात असतांना पादत्राणे घातली नसतांनाही मला त्रास झाला नाही. मी संपूर्ण वेळ चैतन्यातच होते.
५. मला जेवणात पथ्याचे अन्नपदार्थ घ्यावे लागतात. मला आश्रमातही घरच्याप्रमाणेच पथ्याचे अन्नपदार्थ मिळाले.
‘गुरुदेव साधकांची किती काळजी घेतात !’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– आधुनिक वैद्या (सौ.) ज्योती दाभोळकर, बेळगाव (६.५.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।