|

मैसुरू (कर्नाटक) – लोकांनी सनातनींचा सहवास टाळावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावध रहावे; कारण त्यांनी नेहमीच डॉ. भीमराव आंबेडकर अन् त्यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेचा विरोध केला आहे, असे सनातनद्वेषी विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ‘तुमची संगत चांगली ठेवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणार्यांशी संबंध ठेवा, सामाजिक पालटाला विरोध करणार्यांशी नाही’, असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी दिला. ते मैसुरू विद्यापिठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘विश्वज्ञानी आंबेडकर सभागृहा’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्यानंतर राज्य सरकारने संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Siddaramaiah’s Anti-Sanatan Rant!
Karnataka CM Siddaramaiah advises students:
“Stay away from followers of Sanatan Dharma, don’t associate with RSS!” 😡An open attempt to plant hatred for Sanatan values in young minds.
If he truly believes so, why does his govt control… pic.twitter.com/WOp8pArQqa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 19, 2025
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
१. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांवर सनातनवादी मानसिकतेच्या व्यक्तीने बूट फेकणे, हे समाजात हितसंबंध जोपासणारे लोक आणि सनातनवादी अजूनही आहेत, याचा स्पष्ट पुरावा आहे. या घटनेचा केवळ दलितांनीच नव्हे, तर प्रत्येकाने एकमताने निषेध करायला हवा, तरच समाज पालटण्याच्या मार्गावर आहे, असे आपण समजू शकतो,
२. ‘काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत हरवले’, असा अपप्रचार संघवाले करत आहेत; परंतु ‘मला सावरकर आणि कॉम्रेड डांगे यांनी हरवले’, असे आंबेडकरांनी स्वतः लिहून ठेवले आहे. (हे कुठे लिहून ठेवले आहे, हे सिद्धरामय्या यांनी सांगायला हवे. अन्यथा तेच खोटी माहिती समाजासमोर ठेवत आहेत, असेच म्हटले जाईल ! – संपादक) त्यामुळे खोटी माहिती समाजासमोर ठेवून सनातनवाद्यांचा डाव उघड करायला हवा.
| मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषांतरित ट्विट आणि मूळ (कन्नड भाषेतील) ट्विटची लिंक – |
संघाची मानसिकता तालिबानसारखी ! – सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र
यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, संघाची मानसिकता तालिबानसारखी आहे. (तसे असते, तर यतींद्र असे बोलण्याचे धाडस करू शकले असता का ? आणि जरी असे धाडस केले असते, तर ते जिवंत राहू शकले असते का ? – संपादक) ज्याप्रमाणे तालिबान इस्लामचे तत्त्व लादण्यासाठी ‘फर्मान’ (आदेश) काढतो, त्याचप्रमाणे संघ हिंदु धर्म लादू इच्छितो. (हिंदु धर्माला तालिबानशी जोडणार्यांचे डोके पडताळण्याचीच आवश्यकता आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|

हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न