बांगलादेशाची भारताकडे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरातील बिद्याबिल गावात १५ ऑक्टोबरला स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या संघर्षात ३ बांगलादेशी गोतस्कर ठार झाले. बांगलादेश सरकारने म्हटले आहे, ‘हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. भारताने दोषींना शिक्षा करावी. प्रत्येक व्यक्तीचे त्यांचे राष्ट्रीयत्व काहीही असो, त्याचे संरक्षण केले पाहिजे.’ यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तिघांनी गुरे चोरण्याचा प्रयत्न केला आणि एका चकमकीत ते मारले गेले.’ सीमापार तस्करी रोखण्यासाठी कुंपण उभारण्यासाठी भारताने बांगलादेशाला साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.
🔱 Every Inch of Bharat Will Be Defended – Even by Her Villagers!
🇮🇳⚔️ A group of Bangladeshi cow smugglers crossed into India near Bidyabil village in Tripura & attacked locals with iron rods & knives, killing one villager.
As villagers fought back, 3 smugglers were killed.… pic.twitter.com/1wx6ozoxn8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 18, 2025
गोतस्करांनी ग्रामस्थांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केल्याने प्रत्युत्तरात तस्कर ठार
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ही घटना त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेपासून अनुमाने ३ किलोमीटर परिसराच्या आत घडली. या बांगलादेशी तस्करांनी सीमा ओलांडून बिद्याबिल गावात गुरे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांवर लोखंडी शस्त्रे आणि चाकू यांद्वारे आक्रमण केले. त्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आणि इतर घायाळ झाले. गावकर्यांनी प्रत्युत्तर देत तीनही तस्करांना पकडले. या चकमकीत दोघांचा जागीच, तर तिसर्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह बांगलादेशाला परत करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !