२ सहस्र मशिदींवरील ७ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यासाठी राबवलेल्या धडक मोहीमेचा तपशील !

मुंबई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – न्यायालयाचा आदेश, पोलीस, प्रशासन यांना न जुमानता मुंबईतील अनधिकृत आणि अधिकृत अशा २ सहस्रांहून अधिक मशिदींवर लावलेले ७ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यासाठी राबवलेल्या धडक मोहिमेवर प्रकाश टाकणार्या ‘भोंगेमुक्त मुंबई’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ ऑक्टोबर या दिवशी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते झाले. मुंबईच्या इस्लामीकरणाची भयावह स्थिती समोर आणणार्या या पुस्तकाचे लिखाण भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोग्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी, पाठपुरावा आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या सहकार्याने राबवलेल्या धडक मोहिमेची माहिती या पुस्तकात सचित्र आणि आकडेवारीसह देण्यात आली आहे.
Thread 🧵
📚 A new book titled “Bhonge-Mukta Mumbai” by BJP leader @KiritSomaiya, launched by Minister of Culture Affairs @ShelarAshish & Mumbai BJP President @AmeetSatam.
It reveals a campaign to remove over 7,000 loudspeakers from approx. 2,000 mosques in Mumbai. 🎙️🔇 pic.twitter.com/bqALZoCC9O
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 19, 2025
काय आहे पुस्तकात ?
१. गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम ‘फिल्म सिटी’ मार्गावरील कुबा फैजान मशिदीचे भोंगे आजूबाजूच्या भ्रमणभाष टॉवरवर लावण्यात आले. पवई येथील स्वामीनारायण नगर येथे अनधिकृत बांधकाम करून त्याला मशिदीच्या नावाचा फलक लावण्यात आला आणि त्यावर भोंगे लावण्यात आले. भोंगे हटवण्यासाठी मुंबईतील ६७ पोलीस ठाण्यांमध्ये किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या. गोवंडीमध्ये शिवाजीनगर येथे तब्बल ७२ मशिदींवर अनधिकृत भोंगे होते. त्याचा तपशीलही पुस्तकात देण्यात आला आहे. अशा प्रकारे मुंबईच्या इस्लामीकरणाची भयावह स्थिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
२. भोंगेमुक्त मुंबईविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेली माहिती, किरीट सोमैय्या यांनी पोलिसांसह राबवलेली धडक मोहीम, तक्रारी, विविध मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे आदी तपशीलवार माहिती, तसेच ‘भोंगेमुक्त मुंबई’ मोहीम राबवतांना किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या आक्रमणांची माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष