कॉ. पानसरे हत्येचा खटला म्हणजे मालेगाव बाँबस्फोटाच्या खटल्याची पुनरावृत्ती ! – नितीन प्रधान, ज्येष्ठ अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

अनेक वर्षांनंतर या सर्व लोकांना न्याय मिळाला. खरे तर या लोकांना प्रदीर्घ काळ कारागृहात ठेवण्यासारखा या खटल्यामध्ये कुठलाही पुरावा नव्हता. आज न्याय झाला आहे. यात चुका कुणाच्या, या चुकांमध्ये व्यवस्थेचा भाग किती, पोलिसांचा भाग किती यामध्ये मी जाणार नाही; कारण अद्यापही खटला न्यायप्रविष्ट आहे. प्रथम ट्रायल कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. तावडे यांना निर्दाेष मुक्त करण्यात आले. त्या वेळी त्यांचा हत्येमध्ये कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचे न्यायालयाने म्हटले. मालेगाव बाँबस्फोटामध्ये ज्या प्रकारे निर्दाेष व्यक्तींना गुंतवण्यात आले, त्याप्रमाणे या सर्व लोकांना नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्येमध्ये गुंतवण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या वेळी न्यायालयाने केलेल्या वक्तव्यातून याची प्रचीती येते.
न्यायाच्या स्थापनेसाठी हा खटला आम्ही धर्मयुद्धाप्रमाणे लढलो ! – अधिवक्त्या सौ. सिद्धविद्या, मुंबई उच्च न्यायालय

न्यायाला विलंब हा एक प्रकारे अन्याय ठरतो, हे या खटल्यामध्ये दिसून आले. न्यायालयानेही हे ओळखून जामीन संमत केला. अनेक वर्षांनी खटल्यात गुंतवलेल्या व्यक्तींना न्याय मिळाला. या खटल्यात ३०० साक्षीदारांची पडताळणी व्हायची आहे. त्याला आणखी काही कालावधी लागेल. तोपर्यंत निर्दाेष व्यक्तींना कारागृहात ठेवणे उचित नव्हते. या खटल्यामध्ये काम करणार्या अधिवक्त्यांनी व्यावसायिक हेतूने काम केले नाही, तर ‘निर्दाेष व्यक्तीवर अन्याय होऊ नये’, या सामाजिक दायित्वातून आम्ही हा खटला लढवला. ठराविक व्यक्तींसाठी वेगळा न्याय आणि सामान्य व्यक्तींसाठी वेगळा न्याय या खटल्यात आढळून आला. न्यायाच्या स्थापनेसाठी आम्ही हा खटला धर्मयुद्धाप्रमाणे लढलो. ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान यांचे या खटल्यात मोठे योगदान होते. माजी न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांचेही सहकार्य मिळाले. ‘भगवंत कधीही अन्याय करत नाही’, हे या खटल्यातून सर्वांना शिकायला मिळाले.
डॉ. तावडे आणि अन्य अनेक जणांवर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या या लढ्याला ईश्वराने यश दिले ! – अधिवक्ता समीर पटवर्धन, सांगली

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि अन्य अनेक जणांवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण लढा देत आहोत. या लढ्याला ईश्वराने यश दिले. डॉ. तावडे आणि अन्य यांना जामीन मिळाल्यामुळे आनंदच आहे. परमेश्वरी कृपेनेच हे शक्य झाले आहे. त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासारख्या प्रखर हिंदुत्वनिष्ठांना हिंदुत्वनिष्ठ सरकारने सर्व प्रकारचे साहाय्य करावे ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

डॉ. तावडे हे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या गुन्ह्याखाली ९ वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात होते. त्यांची सुटका झाल्यावर त्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा कारागृहात जावे लागले. त्यांचे हिंदुत्वाचे कार्य पहाता त्यांना न्यायालयाने जामीन संमत केल्याचे ऐकून आनंद झाला; परंतु हिंदुत्वाचे काम करणार्या अशा शिलेदारांना खोट्या प्रकरणात विनाकारण अडकवून तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांचे खच्चीकरण केले. आज हिंदुत्वनिष्ठ शासन केंद्रात आणि राज्यात आहे. त्यामुळे डॉ. तावडे यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांना हिंदुत्वनिष्ठ सरकारने सर्व प्रकारचे साहाय्य करावे, असे आम्हाला वाटते. अनेक वर्षे कारागृहात खितपत पडल्यामुळे त्यांचा संसार आणि घरेदारे यांची राखरांगोळी झाली. त्याची हानीभरपाई कोण देणार ? काँग्रेसच्या काळात हिंदुत्वनिष्ठांवर झालेला अन्याय यामुळे काही प्रमाणात दूर झाला.
देश, देव आणि धर्म यांसाठी अविरतपणे कसा लढा द्यावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. तावडे ! – ओंकार शुक्ल, प्रदेशाध्यक्ष, भाजप संस्कृतिक आघाडी, मिरज
गेल्या ९ वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात असून डॉ. तावडे यांनी त्यांची भूमिका आणि त्यांचे विचार सोडले नाहीत. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सर्किट बेंच’द्वारे त्यांना जामीन देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय थोड्या प्रमाणात दूर केला आहे. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार आल्यापासून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा संघर्ष हा वाखाण्याजोगा आणि आदर्श घेण्याजोग आहे. देश, देव आणि धर्म यांसाठी अविरतपणे आणि ठामपणे कसा लढा द्यावा ? याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. तावडे होय !
अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही तथाकथित लोकांनी संघर्षमय कार्यकर्त्यांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्माचे काम करण्यास प्रारंभ करावा. सनातन संस्था डॉ. तावडे यांच्या मागे ठामपणे उभी राहिली, हेसुद्धा कौतुकास्पद आहे. परमेश्वर डॉ. तावडे यांना आणि सनातन संस्थेला हिंदु राष्ट्र आणण्यासाठी बळ देवो, ही प्रार्थना !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !