वर्ष २००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणी निर्दोष ठरलेले धर्मयोद्धे आणि त्यांचे अधिवक्ते यांचा सत्कार !

कोल्हापूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – १८ वर्षांपूर्वी भोपाळमधून (मध्यप्रदेश) मला अटक केली. यावर्षीची पहिली दिवाळी मी १८ वर्षांनंतर निष्कलंक होऊन साजरी करणार आहे. जे आमच्या नशिबी आले, ते कोणत्याही हिंदुत्वनिष्ठाच्या नशिबी येऊ नये, यासाठीच हा अट्टाहास आहे. भगव्याला अपकीर्त केलेल्या एकाही राजकारण्याला कधीच मत देऊ नये. हिंदूंनी आपला वेळ देऊन हिंदु धर्माची बाजू प्रखरपणे प्रत्येक दिवशी मांडली पाहिजे, असे विधान मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले धर्मवीर श्री. समीर कुळकर्णी यांनी केले. वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे घडलेल्या बाँबस्फोटात निर्दोष झालेले धर्मवीर आणि त्यांना या प्रकरणांमध्ये साहाय्य करणारे अधिवक्ते यांचा सत्कार सोहळा १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूरमधील ‘देवल क्लब’ येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या सोहळ्यात धर्मवीर समीर कुळकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच समवेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्त्या प्रीती पाटील यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सत्कार करण्यात आला. सोहळ्याला ८०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते. सोहळ्याचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे आणि श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले.

श्री. समीर कुळकर्णी पुढे म्हणाले,
१. मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी एकमेकांना ओळखतही नव्हते; पण या सर्वांमध्ये एकच साम्य होते ते म्हणजे देशभक्ती ! या सर्वांना विश्वपटलावर अपर्कीत करण्याचे कारस्थान आहे. आमच्यासारख्या अनेक हिंदुत्वनिष्ठांवर झालेला अन्याय पहाता दुर्दैवाने या देशातील अन्वेषण यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत नसून तत्कालीन सत्ताधार्यांच्या तालावरच नाचण्यात त्या धन्यता मानतात, असेच म्हणावे लागेल.
२. तत्कालीन शासनकर्त्यांनी मालेगाव, तसेच त्यानंतर झालेले अनेक बाँबस्फोट यांचा शोध न घेता हिंदुत्वनिष्ठांना त्यात जाणीवपूर्वक गुंतवले; मात्र मी आणि मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) यांनी तत्कालीन यंत्रणांच्या अत्याचाराला न घाबरता निडरपणे त्याला सामोरे गेलो. जे आमच्या नशिबी आले, ते यापुढील काळात कोणत्याही हिंदूच्या नशिबी येऊ नये, यांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे.
३. आपण पराक्रम आणि पुरुषार्थ यांचे पाईक आहोत. जिथे धर्म आहे तिथेच विजय असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदु धर्माचे कार्य करत रहाणार.

राजसत्ता जर हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांकडे असेल, तर देश सुरक्षित ! – मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त)

ज्या दिवशी मालेगाव येथे बाँबस्फोट झाला, त्या दिवशी मी मुंबईत होतो; मात्र मला या प्रकरणात अटक केल्यावर मारहाण करण्यात आली. गेल्या १७ वर्षांत माझ्या कुटुंबियांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. मला मारहाण करून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, डॉ. प्रवीण तोगाडिया, श्री श्री रविशंकर, योगी आदित्यनाथ यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर बळजोरी करण्यात आली; पण मी शेवटपर्यंत त्यांची नावे घेतली नाहीत. हिंदूंनी पुन्हा कधीही काँग्रेस पक्षाला सत्तेवर निवडून देऊ नये. न्यायालयाला पहिल्या दिवसापासून माहिती होते की, मी निर्दोष आहे; पण तरीही आम्हाला सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही दृष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे राजसत्ता जर हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांकडे असेल, तरच देश सुरक्षित राहील, हे आपण सर्व हिंदूंनी लक्षात ठेवायला हवे. आम्हाला अत्याचार सहन करण्यासाठी ईश्वरी शक्ती प्रेरणा देत होती. इस्लामचा प्रचार करणारे कट्टरपंथी, नक्षलवादी, साम्यवादी, पाकिस्तानची गुप्तचर संघटना हे या देशातील मठ, मंदिरे आणि हिंदु धर्म यांची चित्रपट, नाटके, फलक अन् विविध कार्यक्रम यांतून अपर्कीती करत आहेत. या हिंदुद्वेषी लोकांच्या षड्यंत्रापासून सावध राहिले पाहिजे.
हिंदूंच्या विरोधातील ‘इकोसिस्टीम’च्या विरोधात हिंदूंना लढा द्यावा लागेल ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

यापुढील काळात सचिन अंदुरे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर यांचाही सत्कार याच ठिकाणी आणि याच व्यासपिठावर होईल. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर गळा काढला जातो. देशात संवेदनशील वातावरण निर्मिती केली जाते; मात्र साम्यवाद्यांनी देशातील गरीब आदिवासी, पोलीस, आमदार, सीमेवरील सुरक्षारक्षक अशा १४ सहस्रांहून अधिक जणांच्या हत्या केल्या, याविषयी कुणी बोलत नाही, त्याचा राग कुणी व्यक्त केला नाही, तसेच माध्यमांनी दाखवले नाही. कोरेगाव-भीमा प्रकरण पाहिले, तर यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट केला होता, हे आपल्यासमोर उशिरा आणले गेले. मी आतापर्यंत जी लढाई लढली त्यात देवाची अनुभूती घेतली. हिंदु राष्ट्राची भाषा केल्यावर हिंदुस्थानला तालिबान ठरवले जाते; मात्र इस्लाम, ख्रिस्ती यांना त्यांच्या पद्धतीनुसार देश चालवता आला नाही. मग हिंदु राष्ट्राला विरोध का ? हिंदु राष्ट्र कसे चालवायचे आहे, ते आम्ही पाहून घेतो, त्याचा इतरांनी विचार करायला नको. हिंदूंना समाजात हिंदूंच्या विरोधात चालू असलेल्या इकोसिस्टमच्या विरोधात लढा द्यावा लागेल. मला कोल्हापूर येथे कधीही धर्मकार्यासाठी बोलवा. मी यायला सिद्ध आहे.
भगव्या आतंकवादात फसलेल्यांच्या पाठिशी उभे रहाणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेससारख्या ‘निधर्मी (सेक्युलर)’ विचारांच्या शासनकर्त्यांनी साम्यवादी, जिहादी शक्ती यांच्या समवेत एकत्र येऊन पद्धतशीरपणे ‘देशात ‘भगवा आतंकवाद’ आहे, तो वाढत चालला आहे आणि तो पसरवणार्या काही हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत’, असा अपप्रचार करण्यासाठी मालेगाव २००८ बाँबस्फोट, समझोता बाँबस्फोट, वर्ष २००९
मधील मडगाव स्फोट, दाभोलकर हत्या, पानसरे हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवले. या प्रकरणांचे निकाल घोषित झाल्यावर ‘हा अपप्रचार किती पोकळ होता’, हे आता स्पष्ट होत आहे. ‘भगव्या आतंकवादाचा’ अपप्रचार केल्याने कित्येक हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरी यापुढील काळात हे षड्यंत्र आखणार्यांचे आणि त्यांना आतून साहाय्य करणार्यांचे बुरखे फाडून त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पहिजे.
आमच्यावर कितीही अन्याय झाला, तरी हिंदुत्वाचे कार्य करणे आम्ही सोडणार नाही ! – विक्रम भावे, हिंदुत्वनिष्ठ लेखक

अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यावर कोणतेही अन्वेषण होण्यापूर्वीच १५ मिनिटांत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या गोडसेवादी (हिंदुत्वनिष्ठ) यांनी केल्याचे घोषित केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात माझा आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना कोणताही संबंध नसतांना आम्हाला अटक करण्यात आली. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणार्या डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर या न्यायालयात साक्ष देण्यासाठी आल्या नाहीत. यावरून पुरोगाम्यांचे आरोप किती बेगडी होते, ते लक्षात येते. असे असले, तरी आमच्यावर अन्याय करणार्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, दबावतंत्र वापरून तुम्ही आम्हाला छळाल; मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदुत्वाचे कार्य सोडणार नाही.
एकमेव ऋषितुल्य व्यक्ती म्हणजे अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अनेक हिंदुत्वनिष्ठांचे विनामूल्य खटले लढवून त्यांना फाशी होण्यापासून वाचवले. देशात असे एकमेव ऋषितुल्य व्यक्ती म्हणजे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आहेत, असे सांगून श्री. समीर कुलकर्णी यांनी त्यांचे कौतुक केले. सर्व हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला साहाय्य केले. त्यामुळे आमची निर्दाेष मुक्तता झाली. ‘माझ्या आयुष्यात मी देव पाहिला नाही; पण आदरणीय अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या रूपाने मला देव दिसला’, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित संत आणि मान्यवरनिपाणी (कर्नाटक) येथील पू. प्राणलिंग स्वामीजी, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, ‘हिंदु एकता’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळा’चे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे श्री. प्रशांत पाटील, उद्योजक श्री. बाबासाहेब कोंडेकर आणि श्री. सुहास तेंडोलकर, ह.भ.प. महादेव यादव महाराज, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, अखिल भारत हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या शीला माने, रश्मी साळोखे, श्री. विकास जाधव, हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी थोरवत, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा गोरक्षक श्री. महेश कोरवी, श्री. दत्ता पाटील यांसह अन्य उपस्थित होते. |
विशेष
- प्रारंभी सत्कारमूर्तींनी मिरजकर तिकटी येथील शेषशायी विष्णूचे दर्शन घेतले, तसेच तेथील क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. यानंतर जीपमधून त्यांची सोहळ्याच्या सभास्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
- या सोहळ्यात श्रीराम सेना कर्नाटक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना यांनी धर्मयोद्धे आणि अधिवक्ते यांचा सत्कार केला.
- देवल क्लबचे सभागृह खचाखच भरले होते, तसेच सभागृहाच्या बाहेरही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सोहळा पहाण्यासाठी गर्दी केली होती.
क्षणचित्रे
- सोहळ्यातील सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकून उपस्थित सर्व धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ हे पुष्कळ प्रभावित झाले. हिंदुत्वनिष्ठांचा या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना ‘आपल्या पाठिशी असे धर्मयोद्धे अधिवक्ते आणि सोहळ्यातील मान्यवर असल्याने आपण हिंदु धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे’, अशी भावना निर्माण झाली.
- रस्त्यावरून ये-जा करणारे लोकही या सोहळ्याकडे पहात होते.
- धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सोहळ्यानंतर ‘सोहळा उत्कृष्ट झाला आणि हिंदु धर्मासाठी लढू’, असा अभिप्राय दिला.
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !