भारतात ख्रिस्ती धर्माचा विस्तार, म्हणजे सनातन धर्माच्या अस्तित्वावर संकट !

मिझोरामपासून नागालँडपर्यंत आणि त्यापलीकडेही ‘डॉमिनस जीझस’चा (ख्रिस्ती पंथांचा) वाढता प्रभाव हा धर्मांतराच्या दृष्टीने होत असलेला येशूच्या शिकवणीचा प्रचार अन् फुटीरतावादी प्रवृत्तींच्या सुव्यवस्थित मोहिमेचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर भारतातील सनातन धर्माच्या अस्तित्वाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१. भारताच्या ख्रिस्तीकरणाच्या प्रयत्नांतील पालटलेले डावपेच

ख्रिस्ती धर्माचा प्रचार, फुटीरतेच्या मागण्या आणि भारताच्या भविष्यासंदर्भात माजी पोप यांच्या मनातील ‘प्रोजेक्ट भारत’ आताच्या घडीला देशात पूर्णपणे सक्रीय झाला आहे. हेच आज अचानक वाढलेल्या धर्मप्रचाराच्या घटनांचे मूळ कारण आहे. ‘डॉमिनस जीझस’, म्हणजे ‘केवळ एकच देव आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त’, ही पोप बेनेडिक्ट सहावे यांची संकल्पना होती. या मोहिमेचा उद्देश ‘पृथ्वीवरून सनातन धर्माचे शेवटचे अंशही पूर्णतः नष्ट करणे’, हा होता.

जे सनातन धर्माचे प्रखर अनुयायी असा दावा करतात की, परकीय आक्रमकांच्या आक्रमणांनंतर आणि दीर्घकालीन दडपशाहीनंतरही भारतात सनातन धर्म काळाच्या कसोटीवर टिकून राहिला, त्यांनी आता हा समज पालटणे आवश्यक आहे; कारण धर्मविरोधकांचे डावपेच गेल्या अनेक दशकांत पूर्णपणे पालटले आहेत. आता धमक्या, हिंसा किंवा दडपशाही यांऐवजी धर्मांतर करणारे लोक आता गोड गोड शब्द आणि आकर्षक उपक्रम या आडून लोकांना सनातन धर्म सोडून ख्रिस्ती धर्माच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. मिझोराम ‘स्वतंत्र ख्रिस्ती देश’ होण्याच्या वाटेवर

मिझोरामचे मुख्यमंत्री पीयू लालदुहोमा

‘वाघ स्वतःच्या अंगावरील पट्टे पालटू शकत नाही’, हा वाक्प्रचार मिझोरामच्या संदर्भात अक्षरशः खरा ठरला आहे. तेथील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ख्रिस्ती आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना ‘मिझोराम हे ख्रिस्ती बहुसंख्य राज्य असल्याने ते स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्र होण्याव्यतिरिक्त अन्य कशावरही समाधानी रहाणार नाही’, असे विधान केले होते. ही मागणी म्हणजे ‘नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ (एन्.एस्.सी.एन्.) या संघटनेच्या ‘स्वतंत्र ख्रिस्ती नागालँड देशा’च्या दीर्घकालीन मागणीचा पुढचा टप्पाच म्हणावा लागेल. ‘एन्.एस्.सी.एन्.’ने तर असे सरकार स्थापन केले आहे, ज्याचे कार्य ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथून चालते. नागालँडमधील आतंकवादी कारवायांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली, तरी ती केवळ ‘एन्.एस्.सी.एन्.’चे नेतृत्व करण्यासाठी नागा जमातींमध्ये जो सत्तासंघर्ष चालू आहे तो त्यामुळे !

ज्यांनी फुटीरतावादी चळवळ चालू केली, ते इसाक चिशी स्वू आणि एस्.एस्. खापलांग यांचे अनुक्रमे वर्ष २०१६ अन् वर्ष २०१७ मध्ये निधन झाले. ती चळवळ आता एका निर्णायक वळणावर आहे; परंतु ‘एन्.एस्.सी.एन्.’चे नेतृत्व करणारे थुईंगलेंग मुइवा हे ‘स्वतःचा झेंडा आणि राज्यघटना असलेले नागालँड हा स्वतंत्र देश असावा’, यावर ठाम आहेत. त्यामुळे भारताला नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या कोणत्याही उपाययोजना करणे अशक्य झाले आहे.

श्री. कुमार चेल्लप्पन

३. इंडोनेशियाशी लढा देऊन स्वतंत्र खिस्ती प्रजासत्ताक बनलेले तिमोर बेट !

नागालँड आणि मिझोराम येथील घडामोडींकडे इंडोनेशियन द्वीपसमूहातील एक बेट असलेल्या ‘पूर्व तिमोर’ या ख्रिस्ती प्रजासत्ताक देशाच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. ९९.५ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या ‘पूर्व तिमोर’ने इंडोनेशियाविरुद्ध लढा दिला आणि वर्ष २००२ मध्ये द्वीपसमूहातून वेगळे होण्यात यश मिळवले. ‘तिमोर-लेस्ते’ असे नाव असलेले ते २१ व्या शतकातील पहिले सार्वभौम प्रजासत्ताक बनले आहे. या बेटावरील स्वातंत्र्य चळवळीला युरोपातील अनेक ख्रिस्ती देशांनी अर्थसाहाय्य केले होते.

तिमोर समुद्रात वसलेला हा ख्रिस्ती प्रजासत्ताक देश सुनामी आल्यानंतर १० ते १५ मिनिटांत पूर्णतः नष्ट होण्याची शक्यता आहे, तरीही तेथील लोकांची जिद्द आणि उत्साह अल्प झालेला नाही.

४. ‘झोरम पीपल्स मुव्हमेंट’चे प्रमुख लालदुहोमा यांची ‘स्वतंत्र मिझो राष्ट्र’ करण्याविषयीची मागणी

‘झोरम पीपल्स मुव्हमेंट’चे प्रमुख बनलेले लालदुहोमा

‘आय.पी.एस्.’ (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी असलेले काँग्रेस नेते आणि ‘झोरम पीपल्स मूव्हमेंट’चे (झोरम लोकांची चळवळ) प्रमुख बनलेले लालदुहोमा त्यांच्या अमेरिका दौर्‍याच्या वेळी इंडियाना पोलीस येथे खास आमंत्रित मिझो ख्रिस्तींना संबोधित करत केलेल्या भाषणात म्हणाले, ‘‘भारतामधील फुटीरतावादासाठीच्या नव्या आंदोलनाचा हा प्रारंभ आहे. मिझो हे एक राष्ट्र आहे; परंतु ते म्यानमार, बांगलादेश आणि भारत या ३ सरकारांमध्ये विखुरलेले आहेत. ज्या देवाने आपल्याला राष्ट्र बनवले आहे, त्याच्या सामर्थ्याने आपण आपल्या राष्ट्राचे भाग्य ठरवण्यासाठी एक दिवस एकाच नेतृत्वाखाली एकत्र येऊ आणि आपले राष्ट्रीयत्व साध्य करू, असा आत्मविश्वास अन् दृढनिश्चय आपल्याला हवा आहे. एखाद्या देशाच्या सीमा असल्या, तरी खरे राष्ट्र अशा मर्यादा ओलांडते. आमचे अन्यायकारकपणे विभाजन झाले आहे. आम्हाला ३ वेगवेगळ्या देशांमध्ये ३ वेगवेगळ्या सरकारांच्या अधिपत्याखाली रहाण्यास भाग पाडले गेले आहे आणि ही गोष्ट जी आम्ही कधीही स्वीकारू शकत नाही.’’

लालदुहोमा हे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते. या नात्याच्या माध्यमातून त्यांचा सोनिया गांधींशी जवळचा संपर्क झाला होता. त्यांनी काँग्रेस सोडली आणि धोरणात्मक पाऊल म्हणून ‘झोरम पीपल्स मूव्हमेंट’मध्ये सामील झाले अन् वर्ष २०२३ मध्ये ते मिझोरामचे मुख्यमंत्री झाले. इंडियाना पोलीस येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला संबोधित करतांना लालदुहोमा यांनी उपस्थितांना सांगितले, ‘त्यांना भारत आणि बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा मान्य नाही.’ मिझो लोकांचे ३ देशांमध्ये विभाजन करणार्‍या व्यवस्थेचा निषेध करण्याचा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की, आता त्यांनी ख्रिस्ती प्रजासत्ताक स्थापन करण्यासाठी आंदोलन चालू करण्याची वेळ आली आहे.

५. भारतामध्ये होत असलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसाराला केरळमधील साम्यवादी सरकारचा पाठिंबा

भारत हा अभूतपूर्व ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि धर्मांतर यांचा साक्षीदार आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत ‘स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्र’ निर्माण करण्याची मागणी अधिकाधिक जोर धरत आहे. चर्चला पाद्री आणि नन म्हणून भरती करण्यासाठी नवीन विश्वासू लोकांची भरती करणे कठीण होत आहे. हे समाजात आलेल्या नवीन समृद्धीमुळे आहे. यामुळे तरुण मुले ब्रह्मचर्याची कल्पना टाळत आहेत. वर्ष १९८० च्या दशकाच्या प्रारंभीपर्यंत समाजातील गरीब कुटुंबातील मुलींनी नन होण्याचा पर्याय निवडला; कारण बहुतेक घरांमध्ये डझनभर मुलींचे लग्न करायचे होते. जर एक किंवा दोन मुलींनी नन बनण्याचा निर्णय घेतला, तर पालकांना मोठा दिलासा मिळत असे. केवळ केरळमधील चर्चच नव्हे, तर युरोपमधील ख्रिस्त्यांकडून संचालित संस्थाही नन आणि घरगुती परिचारिका म्हणून काम करण्यासाठी नवीन भरती मिळवण्यासाठी धडपडत होत्या. यासाठी युरोपमधील प्रतिनिधींनी (प्रामुख्याने ब्रिटन, इटली, जर्मनी इत्यादींमध्ये काम करणारे केरळमधील ख्रिस्ती धर्मगुरु आहेत.) केरळचा दौरा केला आणि मुलींना चांगले वेतन आणि रहाणीमान देत मुलींची भरती केली. इटली, जर्मनी आणि इंग्लंड येथील त्यांच्या नवीन घरांमध्ये भरती झालेल्या मुलींनी भोगलेल्या दुःखाचे वर्णन इंग्लंडमधील ज्येष्ठ पत्रकार सोनिया डौगल यांनी एका पुस्तकाद्वारे केले आहे. ‘द नन-रनर्स’ (हॉडर अँड स्टॉग्टन, १९७१) हे पुस्तक लिहिण्यापूर्वी तिने केरळ आणि युरोपमधील ख्रिस्ती केंद्रांचा दौरा केला होता. या पुस्तकाने केरळच्या जनतेला धक्का दिला आणि ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे (‘सीपीआय’चे) मुखपत्र ‘जनयुगम’ने त्याचे मल्याळम् भाषेत भाषांतर केले आणि ‘कन्या वाणीभाक्कर’ या नावाने ती मालिका म्हणून प्रकाशित केली. विशेष म्हणजे, सध्याचे ‘सीपीआय’चे नेते हे चर्चचे कट्टर समर्थक आणि भारतातील प्रमुख हिंदुविरोधी शक्ती आहेत.

ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सांगण्यावरून माओवाद्यांकडून स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या

स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची माओवाद्यांनी गोळ्या घालून केली होती हत्या !

ओडिशामधील धर्मांतरित आदिवासी आणि दलित वर्ग यांना सनातन धर्मात परत आणण्याचे ध्येय असलेल्या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती या अष्टपैलू हिंदु संतांची वर्ष २००८ मध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सांगण्यावरून माओवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ओडिशातील त्यांच्या धर्मांतर मोहिमेत हे संत अडथळा वाटले. तमिळनाडूच्या तिरुनेलवेली येथील पाद्री स्टॅन सामीचे यांचे नाव मारेकर्‍यांच्या सूचीत होते; परंतु केवळ उच्च पदांवरील लोकांना ठाऊक असलेल्या काही कारणांमुळे त्याला या प्रकरणातून वगळण्यात आले.

– श्री. कुमार चेल्लप्पन

६. लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे उल्लंघन करणारे ख्रिस्ती आर्चबिशप

मिझोराम, नागालँड, छत्तीसगड, नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराला आंध्रप्रदेशातील तिरुपति बालाजी मंदिराशी जोडणारा ‘रेड कॉरिडॉर’ (साम्यवाद्यांचा पट्टा) आणि अशाच प्रकारच्या घटना हे सिद्ध करतात की, डॉमिनस जीझस भारतात जोमाने कार्यरत आहे. ‘मिशन लव्ह जिहाद’ कदाचित २ दशके जुने असेल; परंतु डॉमिनस जीझस ६ ऑगस्ट २००० पासून मजबूत होत आहे. आपल्याकडे जोसेफ पॅम्पलेनी नावाचे एक आर्चबिशप आहेत. त्यांनी ‘जर रबरची किंमत प्रति किलोवर ३ रुपयांपर्यंत वाढली, तर वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप केरळमधून किमान २ लोकसभा जागा जिंकेल, हे ख्रिस्ती सुनिश्चित करतील’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगण्याचे धाडस केले. मतांच्या विक्रीवर बंदी घालणार्‍या लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे हे उघड उल्लंघन नव्हते का ?

७. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संवेदनशील स्थानांवर प्रभाव टाकण्यामध्ये चर्चला यश

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संवेदनशील अन् धोरणात्मक स्थानांवर स्वतःच्या विचारांचा प्रभाव टाकण्यामध्ये चर्चला यश आले होते. कृषी, शिक्षण, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास, आरोग्य, अंतर्गत सुरक्षा, परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), ‘मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायदा (पी.एम्.एल्.ए.)’ आणि इतर अनेक विभाग यांमध्ये सरकारने सिद्ध केलेल्या धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी हे केले जाते. जरी मानवी तस्करीपासून ‘पॉक्सो’ (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यापर्यंतच्या आरोपांवर ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन यांना अटक झाल्याच्या अनेक घटना घडल्या असल्या, तरी भारतीय कायदे त्यांना हानी पोचवू शकत नाहीत.

धर्मांतर कायद्यात पालट केल्याने ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा मार्ग सुकर होणे !

एक काळ असा होता, जेव्हा ज्यांना इतर धर्मात धर्मांतर करायचे होते, त्यांना जिल्हाधिकार्‍यांसमोर प्रतिज्ञापत्र प्रविष्ट (दाखल) करावे लागत असे आणि ते सरकारी राजपत्रात प्रकाशित करावे लागत असे; पण हा कायदा रहित करण्यात आला आहे. जर तुम्हाला ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा असेल, तर केवळ चर्चमधील धर्मगुरूंना सांगावे लागेल, जे तुम्हाला प्रतीकात्मक रूपाने बाप्तिस्मा देतील. तुम्हाला तुमचे नाव पालटण्याची आवश्यकता नाही. केवळ चर्चचे अधिकारी आणि प्रार्थना समूहाच्या सदस्यांनाच कळेल की, तुम्ही त्यांचे स्वतःचे बंधू आहात.

– श्री. कुमार चेल्लप्पन

८. मुल्ला आणि बिशप यांच्या धमक्यांमुळे अद्वैत आश्रमाचे अनाथाश्रम आणि महिला वसतीगृहे बंद होणे

केरळच्या कोझिकोडमधील कोलाथुर येथे हिंदूंचे आध्यात्मिक नेते ‘अद्वैत आश्रमम्’चे मठाधीश स्वामी चिदानंदपुरी यांना मार्क्सवादी, मुल्ला आणि बिशप यांच्या सततच्या धमक्यांमुळे आश्रमांतर्गत कार्यरत असलेली अनाथाश्रम अन् महिला वसतीगृहे बंद करावी लागली. याविषयी स्वामीजी म्हणाले, ‘‘अशा कोणत्याही संस्थांना राज्यात काम करू दिले जाणार नाही; कारण त्या आदर्श म्हणून चालवल्या जात होत्या. शेवटी ही स्पर्धा केवळ शक्तीच्या बळावर जिंकतात.’’

९. भारताला वाचवण्यासाठी देशात गुरुकुल शिक्षणपद्धत आणणे आवश्यक !

डॉमिनस जीझसच्या जाळपोळीपासून स्वतःला वाचवण्याचा मार्ग कोणता आहे ? भारताने गुरुकुल शिक्षणपद्धत परत आणण्याची आणि देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये वेदपाठशाळा स्थापन करण्याची वेळ आली आहे. या वेदपाठशाळांमध्ये भारतीय ज्ञानपद्धत आणि परंपरेसह आधुनिक अभ्यासक्रम असावा. केरळमधील सनातन धर्म चळवळ, आर्ष विद्या समाज या ख्रिस्ती किंवा इस्लाम या धर्मांमध्ये धर्मांतरित होण्यासाठी घरातून पळून गेलेल्या अनेक मुलींचे जीवन वाचवण्यात यशस्वी झाल्या. आर्ष विद्या समाजाचे प्रमुख असलेल्या आचार्य मनोज यांनी कशामुळे या मुली अब्राहमिक धर्मात धर्मांतरित होण्यासाठी घरातून पळून गेल्या, याविषयी काही मुलींना त्यांच्या जीवनातील कथा लिहायला लावल्या. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये जे लिहिले ते आश्चर्यकारक आहे आणि सर्व हिंदु मुलांच्या पालकांचे डोळे उघडणारे आहे. (२१.९.२०२५)

लेखक : श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.