
१३.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण पू. (श्रीमती) दातेआजींसाठी नामजपादी उपाय करतांना त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहू.
(भाग ५)
या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/966434.html

१३ ऐ. उपाय केल्यावर पू. आजी अधिक आनंदी, समाधानी आणि स्थिर दिसत असणे
सौ. सृष्टी गोगटे (पू. दातेआजींची नात) : १५ दिवसांपूर्वी जेव्हा पू. आजींना पहिला ब्रेन स्ट्रोक आला, तेव्हा मी पुण्यात होते. त्या वेळी मी पुष्कळ अस्वस्थ झाले होते; पण १ दिवसानंतर मी रामनाथी आश्रमात पोचल्यावर माझी अस्वस्थता न्यून झाली. मला आश्रमाच्या सात्त्विक वातावरणाचा परिणामही अनुभवता आला. प.पू. गुरुदेवांनी सांगितलेले उपाय केल्यावर पू. आजी अधिक आनंदी दिसू लागल्या. त्या समाधानी आणि स्थिर दिसत आहेत. आम्ही पू. आजींचे पाय, गुडघे, पोट, छाती, डोके, कान इत्यादी अवयवांवर न्यास करून उपाय केले. त्यांना अंतर्गत रक्तस्राव होत होता. त्या वेळी त्या मध्ये मध्ये डोळे उघडत होत्या. तेव्हा मी त्यांना ‘तुम्हाला काही होत आहे का ? काही दुखत आहे का ?’, असे विचारले. त्यावर त्यांनी ‘त्रास होत नाही’, असे सांकेतिक उत्तर दिले. यावरून ‘त्यांची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे’, असे मला जाणवले.
मी पू. आजींच्या वेगवेगळ्या अवयवांवर न्यास करून उपाय करायचे. आरंभी मला थोडा ताण जाणवायचा; पण १० – १५ मिनिटांनी माझा ताण निघून जायचा. आता मी पू. आजींसाठी १ – २ घंटे उपाय करूनही मला त्रास होत नाही.

१४. पू. आजींसाठी उपाय करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे
१४ अ. १ – १ घंटा उभे राहून उपाय केल्यावरही कमरेत किंवा हातांत वेदना न जाणवणे
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : गुरुदेव मला जे उपाय करण्यास सांगतात, त्यानुसार मी उपाय करण्याचा प्रयत्न करतो. मी १ – १ घंटा उभा राहून उपाय करतो. तेव्हा ‘१ घंटा कसा जातो ?’, हे मला कळतच नाही. मला कमरेत किंवा हातांत वेदना होत नाहीत. ‘आणखी कुठे उपाय करू ?’, हे मला सुचते.
१४ आ. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर पू. आजींची स्थिती सुधारणे आणि स्वतःला आनंद मिळणे : गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे अनाहतचक्रावर उपाय केल्यावर तिथल्या प्राणशक्तीवहनातील अडथळा पुढे सरकला, तर माझा हातही आपोआप पुढे सरकतो. उपायांमध्येही पालट होतो आणि त्याचा परिणाम पू. आजींवर होतो, उदा. कपाळावर त्रासदायक स्पंदने असल्यास ती निघून जातात. पू. आजींना शांत झोप लागते. अशा प्रकारे त्यांच्यात पालट होतो आणि मलाही पुष्कळ आनंद मिळतो.
१४ इ. ‘पू. आजींच्या आत पुष्कळ आनंद आहे’, असे जाणवणे : एक दिवस पू. आजींवर अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण आले होते. ते माझ्या हाताला जाणवले. जेव्हा मी त्यांच्याशी ध्यानातून संपर्क केला, तेव्हा मला आतून पुष्कळ आनंद जाणवला. त्यांच्यावर अनिष्ट शक्तींचा प्रभाव होता; पण ‘आतून त्यांच्यात पुष्कळ आनंद आहे’, हे माझ्या लक्षात आले.
१४ ई. गुरुदेवांनी सांगितलेला अक्षर, अंक, बीजाक्षर किंवा शब्द यांचा नामजप केल्यावर पू. आजींवर अचूक उपाय होऊन त्यांचा त्रास दूर होणे
सद्गुरु अनुराधा वाडेकर (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना उद्देशून) : प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार आतापर्यंत देवतांचे आणि निर्गुणाचे जप यायचे; पण आता गुरुदेवांनी ‘पं’ हा जप सांगितला किंवा वेगवेगळे अंक अन् अक्षर यांचे नामजप येत आहेत. त्याचे शास्त्र सांगू शकाल का ?
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : प्राणशक्तीत जो अडथळा असतो, त्यासाठी गुरुदेव अक्षर, अंक, बीजाक्षर किंवा शब्द यांचे उपाय अचूकपणे शोधून देतात. एकदा गुरुदेवांनी ‘क्ष’ हा जप करायला सांगितला होता. त्याचा परिणाम अभ्यासल्यावर मला जाणवले की, त्या जपामुळे पू. आजींच्या देहाभोवती असलेली नकारात्मकता आणि जडत्व दूर झाले. एकदा त्यांनी पू. आजींसाठी ‘४०’ हा जप दिला होता आणि कानावर हात ठेवून न्यास करायचा होता. त्याप्रमाणे उपाय केल्याने कानाच्या ठिकाणच्या पोकळीतील अडथळा दूर झाला. गुरुदेव जो जप शोधून देतात, त्याने अचूक उपाय होतात. त्यामुळे त्रास दूर होतो.

१४ उ. पू. आजी त्यांना होणारा त्रास सांगू शकत नसल्याने त्यांच्यासाठी उपाय शोधणे कठीण असणे
सद्गुरु अनुराधा वाडेकर (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना उद्देशून) : ‘अन्य व्यक्तीसाठी उपाय करणे आणि पू. आजींसाठी उपाय करणे’, यांत कोणता भेद आहे ? अन्य व्यक्ती किंवा साधक यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार अडथळे शोधून आपण त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करतो आणि अडथळे दूर करतो. पू. आजींच्या संदर्भात उपाय करतांना उद्देश काय असतो ? पू. आजींच्या संदर्भात वेगळेच आहे. ते म्हणजे अडथळे दूर करण्यापेक्षा चैतन्य कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारे कोणता भेद आहे ?
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : चालती बोलती व्यक्ती ‘स्वतःला कुठे त्रास होत आहे ?’, हे सांगते; पण पू. आजी बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा त्रास आपल्याला शोधून काढावा लागतो. ‘तो अडथळा कुठे आहे ?’, हे शोधणे पुष्कळ कठीण असते. जेव्हा मी पू. आजींसाठी उपाय करत होतो, तेव्हा मला न्यास करण्याचे स्थान मिळत होते; पण प.पू. गुरुदेवांना अचूक स्थान मिळत होते. तेव्हा मला वाटत होते की, स्थान अनाहतचक्र हे आहे; पण गुरुदेवांनी ते स्थान अनाहतचक्राच्या थोडे वर असल्याचे सांगितले. त्यानंतर मी २ – ३ वेळा स्वतःच्या शरिरावरून किंवा पू. आजींच्या शरिरावरून स्थान शोधले. तेव्हा आणखी अचूक उपाय मिळाले. उपाय शोधण्यासाठी शरिरावरून काही अंतरावरून एकदाच हात फिरवून स्थान मिळत नाही, तर २ – ३ वेळा हात फिरवावा लागतो; पण प.पू. गुरुदेवांना ते लगेच कळते.

१५. नामजपासाठी अक्षर किंवा अंक शोधण्याचे प.पू. गुरुदेवांनी सांगितलेले शास्त्र
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : गुरुदेव, ‘नामजपासाठी कोणते अक्षर आहे ?’, हे कसे शोधायचे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सूक्ष्मातून ! आपण शोधायचे नाही. तुम्ही सूक्ष्मातून भगवंताला विचारा, म्हणजे उत्तर येईल. आरंभी ‘अंक कि अक्षर ?’, असे विचारा. समजा, उत्तर ‘अक्षर’, असे आले, तर ‘अ’पासून आरंभ करून ओळीने जी अक्षरे आहेत, त्याविषयी विचारायचे, म्हणजे
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ ङ्
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श
ष स ह ळ क्ष ज्ञ
ही सगळी अक्षरे विचारायची. ज्या अक्षराला भगवंताकडून ‘हो’ उत्तर येईल, तो जप करायचा.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : अंक तर पुष्कळ आहेत. जपासाठी अंक कसे शोधायचे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ३० – ४० च्या वरचा अंक उपायांसाठी लागत नाही. १ ते १० यांतील अंक अधिक महत्त्वपूर्ण आहेत. १० ते १०० अंक एवढे महत्त्वाचे नाहीत.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : एकदा ९० हा अंक आला होता.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो, असे क्वचित् होते.
१६. साधकाला सूक्ष्मातून कळत असल्यास त्याने अन्य साधकाला होणार्या त्रासावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा !

श्री. भानु पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : आपण अनिष्ट शक्तींच्या त्रासावर प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार जप शोधतो. तो तात्पुरता अनिष्ट शक्तीचा अडथळा असतो; पण पू. आजींच्या संदर्भात चैतन्याचा संपूर्ण प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे त्यांचे शरीर निर्जीव होत आहे. तिथे चैतन्याचा प्रवाह चालू होण्यासाठी उपाय आहेत. यांमध्ये काही भेद आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दोन्ही एकच आहेत. अनिष्ट शक्तींनी चैतन्याच्या प्रवाहात अडथळा आणला आहे. त्यामुळे तसे झाले. तो अडथळा दूर झाला, तर चैतन्याचा प्रवाह चालू होतो.
श्री. भानु पुराणिक : त्यासाठी तो साधक स्वतः काही प्रयत्न करू शकतो का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधक बेशुद्ध असेल, तर कसा प्रयत्न करील ?
श्री. भानु पुराणिक : नाही. सर्वसामान्य साधकांनी प्रयत्न करायचे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्हाला सूक्ष्मातले काही समजत असेल, तर प्रयत्न करू शकता. कळत नसेल, तर सूक्ष्मातले कळणार्यांनी सांगायचे की, इथे न्यास करा. त्यानुसार साधक तिथे न्यास करू शकतो.
१७. ‘अक्षर आणि अंक यांचे नामजप शोधून उपाय करणे’, हे अधिक सूक्ष्मातील आहे !
सद्गुरु अनुराधा वाडेकर : आपण साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतो. सध्या तरी देवता आणि निर्गुणातलेच जप येतात. ज्यांच्या त्रासांची तीव्रता अधिक आहे, त्यांच्यासाठी आता तुम्ही जे प्रयोग सांगितले, ते करू शकतो का ? अक्षर किंवा अंक यांचे जप शोधायचे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. हे आणखी खोलात म्हणजे सूक्ष्मातले झाले. प्रत्येक अक्षर किंवा अंक सूक्ष्म स्तरावर कोणत्या ना कोणत्या देवतेशी जोडले गेले आहेत.
सद्गुरु अनुराधा वाडेकर : ‘अंक आणि अक्षरे यांचे नामजप शोधणे’, ही प्रक्रिया शल्यविशारदाने (Surgeon ने) केल्यासारखीच झाली. ‘शब्दांचे नामजप शोधणे’, ही प्रक्रिया आधुनिक वैद्यांनी केल्याप्रमाणे झाली.
१८. ‘पू. आजींकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प.पू. गुरुदेवांनी उपस्थितांकडून करून घेतलेला प्रयोग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता जे इथे आहेत, ते एक प्रयोग करू शकता. ‘पू. आजींचा चेहरा पहायचा आणि तो कसा वाटतो ?’, हे सांगायचे.
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : आता ‘आनंद अधिक प्रमाणात वाढला आहे’, असे वाटते.
सद्गुरु अनुराधा वाडेकर : त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘आध्यात्मिक भावाची स्पंदने येत आहेत’, असे वाटले. त्यांच्या शरिराच्या त्वचेवरील छिद्रे आरामस्थितीत गेल्याप्रमाणे (body pores relax) जाणवले.
पू. (सौ.) संगीता जाधव : ‘पुष्कळ प्रमाणात प्रकाश येत आहे’, असे जाणवते.
सद्गुरु स्वाती खाडये : आधीच्या तुलनेत पुष्कळ आनंद आणि प्रकाश वाढला आहे.
सौ. ज्योती दाते (पू. आजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : पू. आजींना पाहून पुष्कळ आनंद जाणवला आणि ‘त्या आतून पूर्ण समाधानी आहेत’, असे जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : एक प्रश्न स्वतःला विचारा की, आनंद जाणवतो कि शांती जाणवते ?
उपस्थित सर्व जण : शांती जाणवते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पू. आजींच्या चेहर्याकडे पाहून काय जाणवते ? आणि उपस्थित संत अन् सद्गुरु यांच्या चेहर्याकडे पाहून काय जाणवते ?
डॉ. नरेंद्र दाते (पू. आजींचा मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : पू. आजींच्या चेहर्याकडे पाहून अधिक शांत वाटते. ‘पू. आजींच्या मनात कोणताही विचार नाही’, असे जाणवले. अन्य संत आणि सद्गुरु यांच्या चेहर्यावर आनंद आहे; पण शांती अल्प जाणवते.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : पू. आजींचा चेहरा पाहून ‘त्यांचे अस्तित्वच नाही’, असे जाणवते. ‘त्या निर्गुणात आहेत’, असे वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कोणाकडे पाहून अधिक चांगले वाटते ?
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : पू. दातेआजींकडे पाहून अधिक चांगले वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मेक्-अप (सौंदर्यवर्धन) करा, चांगली साडी परिधान करा, त्याला काही अर्थ नाही.
सद्गुरु अनुराधा वाडेकर : आतली स्थिती महत्त्वाची आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. आता त्यांनी डोळे उघडून पाहिले. ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’, असे अनुभूतीचे स्तर आहेत’, असे आपण म्हणतो. ‘त्यांत सर्वांत उच्च स्तर शांतीचा आहे’, हे पू. आजींचा चेहरा पाहून लक्षात येते. आपण म्हणतो, ‘‘आनंदात आहोत !’’ आनंदाच्या पुढे जायचे आहे ना ! ‘कुठपर्यंत जायचे आहे ?’, हे कळण्यासाठी पू. आजींचा चेहरा समोर आणायचा.’
(समाप्त)
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !