
१. सहजता
‘पू. संदीपदादा साधकांशी सहजतेने बोलतात. ते पुष्कळ सहजतेने इतरांना सूत्रे समजावून सांगतात. त्यांनी सांगितलेली सूत्रे साधकांच्या मनाला भावतात.

२. प्रोत्साहन देणे
पू. दादा साधकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतात आणि ‘साधकांनी पुढच्या टप्प्याला जावे’, यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात.
३. प्रेमभावाने आणि नम्रतेने बोलणे
पू. दादा साधकांची प्रेमाने चौकशी करतात. ते साधकांच्या गुणांचे कौतुकही करतात. पू. दादा साधकांना दृष्टीकोन देतांना कधी स्वतःला श्रेष्ठ समजत नाहीत, तर साधकांशी अत्यंत नम्रतेने बोलतात. ते सगळ्यांशी समानतेने बोलतात. त्यांच्या बोलण्यात कधी ‘मी, माझे, मला’, असे शब्द नसतात.
४. शिकण्याची वृत्ती
संत असूनही पू. दादा सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. शिकलेली सूत्रे ते स्वतः आचरणात आणतात.
५. आदर्श व्यक्तीमत्त्व
पू. दादा नेहमी आनंदी असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून एक आदर्श व्यक्तीमत्त्व जाणवते. त्यांना तीव्र शारीरिक त्रास होतो; पण त्याचा त्यांनी स्वतःच्या नियमित साधनेवर परिणाम होऊ दिला नाही. ‘संतांना देहबुद्धी नसते’, हे त्यांच्या उदाहरणातून लक्षात येते.
६. अनुभूती
पू. संदीपदादांशी बोलतांना आध्यात्मिक लाभ होऊन हलके वाटणे : पू. दादांशी बोलतांना आध्यात्मिक लाभ होऊन मला हलके वाटते. त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्याशी बोलतांना माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते.’
– कु. मधुरा मोहन चतुर्भुज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१.२.२०२५)
| • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !