पोलीस प्रशासनातच असे धर्मांध गुन्हेगार असणे धोकादायक !

सांगली, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – कोल्हापूर येथे बनावट नोटा बनवणार्या टोळीला मिरज येथे पकडण्यात आले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार असून पोलिसांनी या हवालदारासह ५ जणांना अटक केली आहे. (धर्मांध कितीही शिकले, तरी गुन्हेगारी वृत्ती सोडत नाहीत, हे यातून लक्षात येत नाही का ? – संपादक) त्यांच्याकडून इनोव्हा कार, ५०० रुपयांच्या १९ सहस्र ६८७ बनावट नोटा, २०० रुपयांच्या ४२९ नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा १ कोटी ११ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
टोळीचा मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार धर्मांध इब्रार आदम इनामदार, सुप्रीत काहाण्या देसाई, राहुल राजाराम जाधव, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, सिद्धेश जगदीश म्हात्रे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चलनातील ५००, २०० रुपयांच्या हुबेहूब नोटा बनवून त्या वितरित करण्याचा प्रयत्न ही टोळी करत होती. सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस महामार्गावर निलजी बामणी येथे सुप्रीत देसाई नावाचा व्यक्ती बनावट नोटा देण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबर्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकसह धाड घालून सुप्रीत देसाई याला कह्यात घेतले. त्याच्याकडे ४२ सहस्र रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या ८४ बनावट नोटा सापडल्या. त्याला कार आणि नोटांसह कह्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार इब्रार इनामदार याच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथील कार्यालयातून नोटा सिद्ध करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या नोटा वितरित करण्यात सहभाग असणारे राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, तसेच मुंबई येथील सिद्धेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांध गुन्हेगार असणारे पोलीस प्रशासन गुन्हे काय थांबवणार ? |
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड