
मुंबई, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – माहीममधील वाजेवाडी येथील मशिदीवर भोंगे लावल्याप्रकरणी १० ऑक्टोबर या दिवशी मशिदीचे व्यवस्थापक शाहनवाज खान आणि मशिदीचे मौलवी यांच्यावर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विकास माळी यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. (कायद्याला न जुमानणारे धर्मांध ! – संपादक)
पोलीस हवालदार विकास माळी यांच्या तक्रारीवरून नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये म्हटले आहे की, ध्वनी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांना भोंगे न लावण्याविषयी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. असे असतांना माहीम (पश्चिम) येथील हजरत शहा बाबा फखरुद्दीन मार्गावरील वाजेवाडी मशिदीवर भोंगे लावण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस हवालदार विकास माळी यांनी मशिदीच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाही.’’ (उद्दाम धर्मांध ! – संपादक)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आल्याची माहिती दिली होती; मात्र काही मशिदींवर पुन्हा भोंगे लावण्यात आले असल्याचे आढळून येत आहे.
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !