|
तिरूवनंथपूरम् (केरळ) – मल्याळम् अभिनेते शेन निगम यांच्या आगामी ‘हाल’ नावाच्या चित्रपटामध्ये गोमांसयुक्त बिर्याणी खात असलेला प्रसंग असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढी संवेदनशीलता केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) दाखवली असून चित्रपटात सुचवलेल्या १५ पालटांपैकी हे दृश्य काढण्यासही सांगितले आहे. तथापि या निर्णयाच्या विरोधात चित्रपट निर्मात्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
चित्रपटाच्या जनसंपर्क अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार सेन्सॉर बोर्डाने ‘ध्वजाला वंदन करणे’ आणि ‘गोमांसयुक्त बिर्याणी खाणे’ हे दोन प्रसंग काढण्यास सांगितले आहे. चित्रपटात गोमांसयुक्त बिर्याणी दाखवली नसून ‘सेन्सॉर बोर्डा’चा अपसमज झाला आहे, असा दावा त्यांनी केला. ‘हाल’ चित्रपट १० सप्टेंबरलाच बोर्डाच्या सदस्यांना दाखवण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाकेंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अर्थात् ‘सेन्सॉर बोर्डा’समोर चित्रपटाचे प्रदर्शन केल्यानंतरही ‘बोर्डाचा अपसमज झाला’, असे म्हणणे हे दूधखुळे विधान आहे. अर्थात् न्यायालयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याची स्पष्ट सूचना निर्मात्यांना द्यावी, ही अपेक्षा ! |

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !