
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने नुकतीच तलाईमन्नार भागात ४७ भारतीय मासेमारांना अटक करून त्यांच्या ५ नौका जप्त केल्या. भारतीय मासेमारांवर श्रीलंकेच्या समुद्री सीमेच्या आत अवैध मासेमारी केल्याचा आरोप आहे. (श्रीलंका असा आरोप करत रहाणार आणि भारत ते स्वीकारत रहाणार आहे का ? भारतीय मासेमारांसाठी भारतीय समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी सरकार उपाय का काढत नाही ?- संपादक)
१. श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपथ यांनी सांगितले की, पकडलेले मासेमार आणि जप्त केलेल्या नौका उत्तरेकडील मत्स्य विभागाच्या अधिकार्यांकडे सोपवण्यात येतील.
२. भारत आणि श्रीलंका यांच्यात मासेमारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. श्रीलंकेच्या नौदलाने अनेकदा भारतीय मासेमारांवर गोळीबार केला आहे. मागील महिन्यात जाफनाजवळ १२ भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाआणखी किती वर्षे हे असे चालणार आहे ? सध्या भारताच्या मेहरबानीवर जगणार्या श्रीलंकेवर भारत कोणताही दबाव निर्माण करत नसेल, तर अशा नीतीचा उपयोग काय ? |
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड