कोल्हापूर येथील गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ८ ऑक्टोबर या दिवशी पाहिल्या आज उर्वरित अनुभूती येथे दिल्या आहेत.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/964882.html

१. सौ. रंजना पाटील, गडहिंग्लज
गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘प्रत्यक्ष सच्चिदानंद गुरुदेवच सर्व सेवा करून घेत आहेत’, असे वाटणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना आणि शरणागती वाढवल्यामुळे सर्व सेवा ठरवलेल्या वेळेपेक्षा आधीच पूर्ण होत होत्या. पाऊस येऊ नये आणि उपस्थिती वाढावी; म्हणून साधकांकडून सातत्याने प्रार्थना होत होत्या. त्यामुळे गुरुकृपा अनुभवता आली. शहर आणि ग्रामीण भागांतून उपस्थिती वाढली. त्या दिवशी पाऊस आला नाही. कार्यक्रमाच्या वेळी सर्व साधकांमध्ये संघटित भाव दिसून आला. ‘सर्व सेवा प्रत्यक्ष सच्चिदानंद गुरुदेवच करून घेत आहेत’, असेच सर्वांना वाटले. सर्व जण पुष्कळ आनंदी दिसत होते. अल्प कालावधीमध्ये प्रसार करूनही पुष्कळ छान प्रतिसाद मिळाला. गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
२. श्री. राजू पाटील, निपाणी, बेळगाव.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांना सूक्ष्मातून क्षमायाचना करून ‘मी गांभीर्याने साधना करीन’, असे वचन दिल्यावर ‘ते स्फूर्ती देत आहेत’, असे जाणवणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्राचे पूजन झाले. त्यानंतर दर्शन आणि प्रसाद घेण्यासाठी मी रांगेत उभा होतो. तेव्हा प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पहातांना ‘प.पू. बाबा माझ्याकडे गंभीर होऊन पहात असून ‘ते डोळ्यांतून काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर माझे ‘हरि ॐ तत्सत् ।’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज’, असे नामजप चालू झाले. तेव्हा ‘प.पू. बाबा मला प्रेमाने न्याहाळत आहेत’, असे मला जाणवले आणि माझा भाव जागृत झाला. मी सूक्ष्मातून प.पू. बाबांच्या चरणी क्षमायाचना केली आणि ‘मी गांभीर्याने साधना करीन’, असे त्यांना वचन दिले. तेव्हा ‘प.पू. बाबांच्या चेहर्यावरील भाव पालटले असून ते मला स्फूर्ती देत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर मला हलकेपणा जाणवला.’
– सर्व सूत्रांचा दिनांक (१०.७.२०२५) (समाप्त)
|
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !