काँग्रेसचे मंत्री संतोष लाड यांच्यासह अधिकारी उपस्थित

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – हुब्बळ्ळीच्या वॉर्ड क्रमांक ३४ अंतर्गत येणार्या विशाल नगरमध्ये महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम (HESCOM) विभाग यांच्या विविध कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड आले होते. नगरसेवक मंगळम्मा गौरी आणि काँग्रेसचे नेते दीपा नागराज गौरी यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते.
🚨 Quran Recitation at Govt Event in Hubballi, Karnataka!
Congress Minister Santosh Lad & officials attended as the Qur'an was recited at a state function.
Is this “Sarva Dharma Sama Bhava” or a step towards Islamization?
“Reciting the Qur'an at a government program is… pic.twitter.com/3YT02BH6N1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2025
त्या वेळी कार्यक्रमाचा प्रारंभ मुसलमान समाजातील व्यक्ती हाफीज यांनी कुराण पठण करून केला. या कार्यक्रमात पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते.

सरकारी कार्यक्रमात कुराण पठण करणे खेदजनक ! – विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद
मुसलमान समाजाला खुश करण्यात गुंतलेल्या काँग्रेस सरकारने आता सरकारी कार्यक्रमात कुराण पठणाची संधी देऊन, ‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे’, हे पुन्हा एकदा जगासमोर घोषित केले आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी केली.
The @INCKarnataka government in Karnataka has turned governance into a stage for vote-bank appeasement.
In Hubballi, a government function—the foundation stone laying of civic and public works—began with Quran recitation, openly violating the sanctity and neutrality of state… pic.twitter.com/n2rLZJfdTC
— Arvind Bellad (@BelladArvind) October 7, 2025
ते म्हणाले की,
समारंभात उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांनी कुराण पठणाला संधी देणे योग्य नव्हते. हा जर एका समाजाचा खासगी कार्यक्रम असता, तर कुणाचाही आक्षेप नसता; परंतु सरकारी कार्यक्रमात कुराण पठणाला संधी देणार्या अधिकार्यांवर मंत्र्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते. याऐवजी त्यांनीच याला प्रोत्साहन दिले, हे खेदजनक आहे.
मंत्री संतोष लाड कार्यक्रमात भाषण करतांना अजान (नमाजपठणासाठी बोलावणे) ऐकू येताच स्वतःचे भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण चालू केले. |
संपादकीय भूमिका
|
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !