
उळे (जि. सोलापूर) – नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या पार्श्वभूमीवर हिंदु समाजाच्या विविध स्तरांमध्ये धर्मभावना जागृत होत असून, हिंदु भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा महाराष्ट्रात तातडीने लागू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? – संपादक)

या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उळे (जि. सोलापूर) येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील भाविक आणि तरुणवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून भाविकांनी मोठ्या संख्येत स्वाक्षरी करून या मागणीला समर्थन दिले.

हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप ढगे, धनंजय बोकडे, लिंगराज हुळ्ळे, तसेच कु. श्रद्धा सगर, कु. श्रीविद्या पोगुल यांनी या प्रसंगी उपस्थित भाविकांना ‘लव्ह जिहाद’ विषयी जागरूक केले, तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगून आणि ‘मैं हु दुर्गा’ या अभियानाचे फलक हातात घेऊन हिंदु समाजात जागृती केली.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज