
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात लिंगायत समुदायाने वेगळा धर्माचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा केली आहे. यासंदर्भात लिंगायत मठाधीश्वर ‘ओक्कुटा’ (लिंगायत संतांचा संघ) यांनी ‘बसवा संस्कृती अभियान-२०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना याविषयी त्यांचा दृष्टीकोन विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘या सूत्रावर माझा स्वतःचा काहीही दृष्टीकोन नाही. लोकांचा दृष्टीकोन, तोच माझा दृष्टीकोन आहे. सध्या जातीनिहाय जनगणना चालू आहे, त्या वेळी ते (लिंगायत समुदायातील लोक) स्वतःचा धर्म काय सांगतात ? ते पाहू.’
🚨 Fresh demand in Karnataka to grant separate religion status to the Lingayat community!
At the ‘Basava Culture Campaign–2025’, CM Siddaramaiah endorsed the view that 12th-century reformer Basavanna founded a distinct religion.
🧱 BJP slammed this as an attempt to divide Hindu… pic.twitter.com/UAKHcXLndj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2025
हिंदु धर्म आणि समाज यांची फाळणी करण्याचा प्रयत्न ! – भाजप
कर्नाटक राज्याचे भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, लिंगायतांसाठी वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे. ‘यामागे कुणाचा हात आहे ?’, हे लोकांना ठाऊक आहे. हिंदु धर्माचे संरक्षण करणे आवश्यक आहे. समाजाला एकत्र करून सर्वांना न्याय देणे आवश्यक आहे. काही शक्ती हिंदु धर्म आणि समाज यांची फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीही अशा प्रयत्नांनी यश मिळाले नाही आणि भविष्यातही मिळणार नाही.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
धर्मशास्त्र काय सांगते ?
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !