हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी स्वाक्षरी अभियानास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
(इकोसिस्टम म्हणजे विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली)

सांगली, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदुद्वेषी इकोसिस्टम ही सातत्याने पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अपर्कीत करण्याचा प्रयत्न करते. यासाठीच सातत्याने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास करून विविध माध्यमांतून अपप्रचार केला जात आहे. अशा हिंदुविरोधी इकोसिस्टमचा कडाडून विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सरिता चौगुले यांनी येथे केले. दसर्याच्या दिवशी मिरज येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दुर्गामाता दौड समारोपाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘‘मेरा अब्दुल ऐसा नही’, असे म्हणत ‘लव्ह जिहाद’ला थांबवा. हिंदु मुलींमध्ये धर्माभिमान जागृत करणे, कपाळावर कुंकू लावणे, धर्माचरण करण्यासाठी धर्मशिक्षण घेणे या माध्यमांतून हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राविरुद्ध जागृत करता येईल. यासाठी ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा संमत होणे आवश्यक आहे.’’- सौ. सरिता चौगुले, हिंदु जनजागृती समिती
मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवर श्रीकृष्णाचे मंदिर बांधण्यासाठी पुन्हा आंदोलन उभे करणार ! – शंकर वराडकर, विभाग प्रमुख, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास
‘‘मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमण हटवून श्रीकृष्णाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी परत एकदा ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने ‘भारतभर आंदोलन’ करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ म्हणून लवकरच एक भव्य यज्ञ करणार आहोत. सर्व हिंदूंनी या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून लवकरात लवकर मथुरा येथे श्रीकृष्ण जन्म भूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी संघर्ष करूया’’, असे आवाहन श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे विभाग प्रमुख श्री. शंकर वराडकर यांनी केले.
‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा होण्यासाठी राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
महाराष्ट्र राज्यात ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली, मिरज, विश्रामबाग, विटा, ईश्वरपूर, सांगलीवाडी, तासगाव, जत येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला तरुण, तरुणी आणि भाविक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहस्रो जणांनी हा कायदा व्हावा म्हणून या अभियानांतर्गत शासनाला दिल्या जाणार्या निवेदनावर उत्साह आणि आनंदाने स्वाक्षरी केली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !