‘३१.८.२०२५ या दिवशी रात्री ११.३० वाजता मी श्री गणरायाला आत्मनिवेदन करत होतो. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘श्री गणरायाची विविध नावे आहेत. त्यानुसार मी कोणती प्रार्थना करू शकतो ?’ तेव्हा श्री गणरायाने मला त्याच्या नावांवरून प्रार्थना सुचवल्या. त्या येथे दिल्या आहेत.

१. सुमुख : हे सुमुखा, माझ्या मनातील अंधःकार नष्ट होऊन तुझ्या सुंदर मुखासारखे माझे मन निर्मळ आणि सुंदर होऊ दे.
२. एकदंत : हे एकदंता, मला ‘ईश्वरप्राप्ती’ या एकाच ध्येयाप्रती दृढ रहाता येऊ दे. तुझी प्राप्ती होण्यासाठी तूच माझे मन निश्चिंत आणि स्थिर कर.
३. कपिल : हे कपिला, माझ्या साधनेत वृद्धी होऊन विवेक जागृत होऊ दे.

४. गजकर्णक : हे गजकर्णका, मला सातत्याने तुझ्या अस्तित्वाचा आवाज ऐकता येऊ दे.
५. लंबोदर : हे लंबोदरा, साधना करतांना येणारे सर्व अडथळे आणि कठीण प्रसंग यांना सामोरे जाण्याची अन् स्वीकारण्याची शक्ती तूच माझ्यात निर्माण कर.
६. विकट : हे विकटा, माझ्यात साधनेचे प्रयत्न सातत्याने करण्याचे धैर्य तूच माझ्यात निर्माण कर.
७. विघ्नराज : हे विघ्नराजा, माझ्या साधनेतील अहंकाररूपी विघ्नांचा तूच विनाश कर.
८. गणाधिप : हे गणाधिपा, तू गुणांचा अधिपती आहेस, तसेच माझी इंद्रिये आणि विचार यांचा स्वामी (अधिपती) बनून मला साधनेच्या योग्य दिशेने घेऊन चल.’
९. धूम्रवर्ण : हे धूम्रवर्णा, ‘सर्व काही नश्वर आहे आणि सत्य केवळ ईश्वर आहे’, अशा दिव्य ज्ञानाचा संस्कार माझ्या मनावर कर.
१०. भालचंद्र : हे भालचंद्रा, माझी चित्तशुद्धी करून तूच मला आनंद प्रदान कर.
११. गणाध्यक्ष : हे गणाध्यक्षा, समष्टी सेवा करण्यासाठी माझ्यामध्ये आवश्यक नेतृत्व आणि योग्य दिशा देण्याची क्षमता तूच माझ्यात निर्माण कर.
१२. गजानन : हे गजानना, गुरुसेवा करण्यासाठी तूच माझ्यामध्ये सामर्थ्य, सद्सद्विवेक बुद्धी आणि भाव निर्माण कर.
– श्री. अर्जुन पुजारे, ठाणे सेवाकेंद्र, ठाणे (३१.८.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे