
सातारा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे ‘गाव तिथे हवामान केंद्र’ उभारण्यात येणार आहे, यापूर्वी १०२ गावांत स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी झाली आहे. १ सहस्र ४९७ पैकी १ सहस्र २१ गावांत ही स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी दिली. या हवामान केंद्रांमुळे शासनासह शेतकर्यांना हवामानाचा अचूक अंदाज कळेल. अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळण्यास साहाय्य होईल, असा विश्वास परांडे यांनी व्यक्त केला.
कृषी अधीक्षक फरांदे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाच्या हवामानात नेहमीच चढ-उतार आढळून येतो. दुष्काळी पट्ट्यात पडणार्या असमान पावसामुळे शासनाला शेतीच्या झालेल्या हानीची माहिती मिळण्यास अडचण येते. आपत्तीकाळात देण्यात येणार्या सोयीसुविधा यांविषयी शासनापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होते. स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे पर्जन्यमानाची अचूक मोजणी होईल. हवेचे तापमान, पर्जन्यमान, वार्याचा वेग, दिशा, आर्द्रता, गावात किती पाऊस झाला ? याची नेमकेपणाने माहिती मिळेल. आताच्या पावसाळ्यामध्ये मे महिन्यापासून झालेली पावसाची नोंद शासनाकडे मंडलनिहाय उपलब्ध आहे; मात्र मंडळात गावनिहाय पर्जन्यमापक नसल्यामुळे अचूक माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकर्यांना देण्यात येणार्या साहाय्य आणि माहिती यांवर अनेक मर्यादा आहेत. या सर्व गोष्टींचे निरसन स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे होईल.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !