
कोल्हापूर, ५ ऑक्टोबर – नवरात्रीच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद, मातृशक्ती, दुर्गावाहिनी यांच्या वतीने आयोजित मंगलधाममध्ये झालेल्या ‘कुंकूमार्चन सोहळ्या’त पंचक्रोशीतील १२५ युवती-महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व सहभागी महिलांना कुंकू-पादुकासह पूजा साहित्य देण्यात आले. ‘महिला आणि युवती यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाठी-काठी प्रशिक्षण घ्यावे’, असे आवाहन या वेळी जान्हवी पाटील यांनी केले.
या प्रसंगी जिल्हामंत्री विनय बारड आणि उपाध्यक्ष शांतीलाल लिंबानी यांच्या हस्ते प्रारंभी शस्त्रपूजन करण्यात आले. श्वेता कुलकर्णी यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या १ सहस्र ८ नावांच्या श्रीसुक्ताचे पठण केले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी संयोजिका अश्विनी ढेरे, तेजश्री जोशी, विश्व हिंदु परिषद जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, श्रीकांत पोतनीस यांसह अन्यांचा सहभाग होता.
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !