
अहिल्यानगर – येथे १४ सप्टेंबरपासून अतीवृष्टीमुळे १२ तालुक्यांत शेतपिकांसह, वीज, रस्ते आणि बंधारे यांची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेड तालुक्यांतील २८३ तलाव, बंधारे फुटल्याचे पहाणीतून समोर आले आहे. अजूनही हानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ सहस्र ५३१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी ८६२ कि.मी. रस्त्यांची १३९ कोटी रुपयांची हानी झाली आहे, तर १४१ पुलांची २२ कोटी रुपयांची हानी झाली आहे.
८८ पाझर तलाव, १६२ साठा बंधारे, २८ कोल्हापुरी बंधारे, ४ गाव तलाव आणि १ वळचणीचा बंधारा अशी हानीची आकडेवारी आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !