रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

१. बीरेशा इ., दावणगेरे, कर्नाटक.

अ. ‘आश्रम अत्यंत स्वच्छ आणि सुव्यवस्थापित आहे. ‘आश्रमात रहाणारे साधक उत्तम प्रकारे त्याची काळजी घेतात’, हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

आ. ‘केवळ तुमचा आश्रमच सनातन हिंदु धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे’, असे मला वाटते.’

२. श्री. पवन हेब्बारे, फोंडा, गोवा.

अ. ‘हा आश्रम संपूर्ण जगात सर्वाेत्कृष्ट आहे.

आ. ‘दैनंदिन जीवनात आपल्याकडून काय काय चुका होतात ?’, हे मला येथे आल्यावर समजले.’

३. श्री. मयूर डी. एम्., बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘आश्रम सुंदर आहे. हा आश्रम गोवा राज्याच्या मध्यभागी असलेला एक ‘दीप’ आहे.’

४. श्री. हर्षिल आर्या जे. एस्., मंड्या, कर्नाटक. 

अ. ‘आश्रमभेट हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.

आ. आश्रमात आल्यावर मला यापूर्वी कधीही ठाऊक नसलेली अध्यात्म आणि धर्म यांविषयी माहिती मिळाली.

इ. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला आवडेल.

ई. येथील साधकही माझ्यासाठी अत्यंत मूल्यवान आहेत.’

५. श्री. योगेश, कर्नाटक

अ. ‘एक हिंदू म्हणून यापूर्वी मी या आश्रमासारखे आध्यात्मिक स्थळ कुठेही अनुभवले नव्हते.’

६. श्री. राजू काडकल, बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘आश्रमात सर्वत्र सकारात्मकता आणि चैतन्य जाणवले. येथे सेवा करणारे सर्व साधक अत्यंत सकारात्मक विचार करणारे आहेत.

आ. हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांप्रती साधक करत असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.’

७. श्री. आनंदराम शर्मा, मैसुरू, कर्नाटक.

अ. ‘सर्व साधक स्वामीजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सनातन धर्मासाठी उत्तम कार्य करत आहेत.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.९.२०२५)