‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करण्यास शिकवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शिकवणीमुळे साधक निष्काम साधना चांगल्या प्रकारे करू शकत आहेत. या संदर्भातील काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. साधकांना साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने देवाला प्रार्थना करण्यास शिकवणे
‘साधक सकामातील कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना करत नाहीत. यामागे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना वेळोवेळी दिलेले दृष्टीकोन कारणीभूत आहेत, तसेच त्यांनी स्वतः केलेल्या प्रार्थनांविषयीच्या चौकटी ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधूनही प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे साधकांना ‘प्रार्थना कशा करायला हव्यात ?’, याविषयी स्पष्टता आली. त्यामुळे साधक साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने देवाला प्रार्थना करतात, उदा. साधनेतील अडथळे दूर होऊ दे, आध्यात्मिक त्रास दूर होऊ दे, नामजप भावपूर्ण होऊ दे, सेवा परिपूर्ण करून घे इत्यादी.
२. ‘साधकांची साधना व्यय होऊ नये’, त्यासाठी सतर्क रहाण्यास शिकवणे
वर्ष २००४ मध्ये काही साधकांना सूक्ष्मातील कळू लागले. त्या वेळी साधकांना याविषयी जिज्ञासा आणि कौतुकही होते. सूक्ष्मातील कळू लागलेला एक साधक काही दिवसांसाठी त्याच्या घरी गेला होता. त्या वेळी त्याच्या गावात बैलाची झुंज होती. त्याने ‘कोणता बैल ती झुंज जिंकेल ?’, याचे सूक्ष्मातून उत्तर काढले. प्रत्यक्षातही त्याने सूक्ष्मातून काढलेल्या उत्तराप्रमाणेच घडले. त्यानंतर तो साधक आश्रमात आल्यावर त्याने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना याविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझी सहा मासांची साधना यात व्यय झाली.’’ अशा प्रसंगातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना सकामातील, म्हणजे मायेतील गोष्टींमध्ये अनावश्यक कृती करायच्या टाळून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जायला शिकवले आहे.
त्यांनी ‘साधक सेवा करत असतांना त्यांच्यामधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्यांच्याकडून चुका होऊन त्यांची साधना कशी व्यय होते’, याविषयीही साधकांना सत्संगांतून मार्गदर्शन केले आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अशा मार्गदर्शनामुळे ‘साधक स्वत:ची साधना व्यय व्हायला नको’, या दृष्टीने प्रयत्न करतात.
३. प्रत्येक घटनेकडे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर पहायला शिकवणे
साधकांच्या जीवनातील कुठलाही प्रसंग असो वा समष्टीतील एखादी परिस्थिती असो, त्याकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विश्लेषण करून पहायला शिकवले आहे. यामुळे ‘साधक कठीण परिस्थितीतही या तिन्ही स्तरांवर काय उपाययोजना करू शकतो’, याचा विचार करतात. परिणामी ‘साधक सकारात्मक राहू शकतात किंवा त्यातून साधना कशी होईल’, याकडे लक्ष देतात. साधक वैयक्तिक जीवनातील घटना, तसेच सनातन संस्थेवर येणारी संभाव्य बंदी, अशा व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील अनेक गोष्टींकडे सकारात्मक राहून साधनेच्या दृष्टीने पाहू शकतात. ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच कृपा आहे.
४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सिद्धीत अडकू न देणे’, ही त्यांची साधकांवरील अपार कृपा असणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना कोणत्याही सिद्धीत अडकू दिले नाही. आध्यात्मिक पातळी ५० टक्के झाल्यावर सिद्धी प्राप्त होतात. सनातन संस्थेत आज सहस्रो साधक ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे आहेत, तसेच संतही अनेक आहेत; मात्र कुणीही सिद्धीत अडकलेले नाही. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना त्यांच्यामध्ये कोणत्या सिद्धी आहेत, हे कळू दिले नाही किंवा कधी सांगितलेही नाही. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना ‘सिद्धीत अडकू दिले नाही’, ही त्यांची साधकांवरील अपार कृपा आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना संसारात राहून साधना करायला शिकवली, तसेच ते साधकांच्या नकळत त्यांच्याकडून कठीण अशी निष्काम साधनाही करून घेत आहेत’, ही त्यांची साधकांवरील अपार कृपा आहे. त्यांच्या या कृपेसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०२६)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे