परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण १२ जून या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाचा याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sanatanprabhat.org/marathi/1050123.html

एक साधक : वर्गातून वर्ग घेणारे साधक तेवढे मिळत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : कालमाहात्म्य ! मिळाला, तरी ठीक, नाही मिळाला, तरी ठीक. आपण कर्म करत रहाणे, फळाची अपेक्षा करू नये.
एक साधक : अगोदर जिल्ह्यात अधिक वर्ग होते आणि प्रतिसादही चांगला असायचा. आता पूर्वीच्या तुलनेत प्रतिसाद न्यून मिळतो. ‘तो अधिक मिळायला पाहिजे’, असे वाटते. आम्ही वेळेचे नियोजनही करण्यात न्यून पडतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : कालमाहात्म्य असते. दुसरी सेवा करायची. सेवेत रहाणे महत्त्वाचे आहे. आता समष्टी साधना अधिक होत नाही, तर व्यष्टी साधनेचा पाया पक्का करायचा. नामजप करायचा. ‘आता मी काय करू ?’, असे व्हायला नको. माझा संपूर्ण वेळ ग्रंथ लिखाणासाठी असतो. पुढे ५ सहस्र ग्रंथ निघणार आहेत.
एक साधक : सगळे जिल्हे पुढे जात आहेत, तसे ‘गोवा राज्यातही कार्य वाढले पाहिजे’, असे वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जशी परिस्थिती असते, तसा प्रतिसाद मिळतो. ‘गोव्यामध्ये व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा आहे. जिथे वर्ग वाढले पाहिजे, तिकडे देवाने नियोजन करून ठेवले आहे.
एक साधक : वर्गाला प्रतिसाद अल्प मिळाल्यावर मन नकारात्मक व्हायचे. त्यामुळे आनंद मिळायचा नाही. माझा परिस्थिती स्वीकारण्याचा भाग व्हायचा नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा. ईश्वराच्या मनाने सर्व होत असते. कालमहात्म्य आहे. आधी प्रतिकूल काळ होता, आता अनुकूल काळ होईल.
एक साधक : ‘प्रत्येक गावात कसे पोचता येईल ?’, असे वाटते. तसेच ‘साधनेच्या दृष्टीने परिपूर्णता आली पाहिजे’, असेही वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे वाटले पाहिजे. परिपूर्णता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करायची.
एक साधक : आरंभी वर्गासाठी प्रतिसाद अल्प होता. आता स्वतःहून सांगतात, ‘‘तुम्ही वर्ग घ्यायला या.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘कालमाहात्म्य कसे असते ?’, हे लक्षात आले ना ?
एक साधक : ग्रामीण भागात भ्रमणभाषला आंतरजालाची (नेटवर्कची) अडचण येते. त्यामुळे ‘तुम्ही प्रत्यक्ष येऊन वर्ग घ्या’, असे तिकडचे सांगतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : युद्धकाळात वीज कुठे असणार आहे ? आपल्याला प्रत्यक्षच जाऊन सर्वांना शिकवायचे आहे.
एक साधिका : एकदा माझ्या मनात ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, असा विचार आला. तेव्हा ‘कोरोनाच्या काळात समाजात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधनासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप लावण्यात आला होता, तसा सर्वत्र ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, असा नामजप चालू असेल’, असे मला जाणवले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पृथ्वीवरील हिंदु राष्ट्र ‘रामनाथी आश्रमा’सारखे असेल.
(समाप्त)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे