सामाजिक माध्यमांतून टीका

कोलंबो (श्रीलंका) – येथे महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर समालोचन करत होती. तेव्हा तिने पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हटल्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर’ भारताचाच भाग असतांना अशा प्रकारचे विधान केल्याने त्याला विरोध होत आहे.
🚨 Pak cricketer’s anti-India remark
Pakistan’s ex-women’s captain Sana Mir, commentating in Colombo WC match, calls PoK as “Azad Kashmir” while referring to player Natalia Parvez
Faces backlash on social media
Clarification by Sana Mir: claimed no political intent, only… pic.twitter.com/bZoHFhlWXz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 3, 2025
समालोचन करतांना सना मीर हिने पाकिस्तानी खेळाडू नतालिया परवेझ हिचा उल्लेख करून म्हटले, ‘नतालिया काश्मीरची, आझाद काश्मीरची खेळाडू आहे; पण तिला क्रिकेट खेळण्यासाठी लाहोरला यावे लागते.’ आधी ‘काश्मीर’ असे म्हटल्यावर लगेचच सनाने ‘आझाद काश्मीर’ असा शब्दप्रयोग केल्याने विवाद निर्माण झाला.
(म्हणे) ‘कुणालाही दुखावण्याचा किंवा राजकीय भूमिका मांडण्याचा हेतू नव्हता !’ – सना मीर हिचे स्पष्टीकरण
टीका होऊ लागल्यानंतर सना मीर हिने सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. तिने म्हटले, ‘माझा उद्देश केवळ नतालियाच्या संघर्षाची कहाणी सांगण्याचा होता. त्यामागे कुणालाही दुखावण्याचा किंवा राजकीय भूमिका मांडण्याचा हेतू नव्हता. खेळाडूंची पार्श्वभूमी आणि प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हे समालोचकाचे दायित्व असते. इतर २ खेळाडूंच्या संदर्भातही मी तसेच केले, त्यांच्या प्रदेशाचा उल्लेख करून मी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. याला कृपया राजकारणाशी जोडू नका.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची अद्याप प्रतिक्रिया नाही !
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने कोणतेही विधान केलेले नाही. ‘विश्वचषकासारख्या स्पर्धेत राजकीय टिपणीला स्थान नसावे. पुरुष आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यांच्या एका उल्लेखावर त्यांना दंड ठोठावला गेला; पण पाकिस्तानकडून भारताच्या अविभाज्य भूभागाविषयी वारंवार वादग्रस्त शब्दप्रयोग होत असतांनाही ठोस कारवाई होत नाही’, अशी नाराजी तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
संपादकीय भूमिका
|
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया