Durga Idol Vandalised : मशिदीसमोरून जाणार्‍या श्री दुर्गादेवी मूर्तीच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत मूर्ती खंडित !

बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) येथील घटना

बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) – येथील नयाखेडा गावात १ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजवण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. यात मूर्ती खंडित झाली आणि एक हिंदु तरुण घायाळ झाला. (मिरवणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्त का नव्हता ? मिरवणूक मशिदीसमोरून जाणार, तर अनुचित घटना घडू शकते, हे पोलिसांना कसे लक्षात आले नाही ? – संपादक) यानंतर हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी रात्रभर आंदोलन करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. (मुळात अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) केले. या वेळी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. नेपानगरच्या आमदार मंजू दादू आंदोलनस्थळी आल्या आणि त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या मध्यस्थीमुळे वातावरण शांत झाले आणि लोक घरी परतले.

विश्व हिंदु परिषदचे नेते शंकर चौहान यांनी आरोप केला की, घटनेनंतर पोलिसांनी मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगितले होते; मात्र तक्रार देण्यासाठी गेल्यावर आमच्यावर आक्रमण झाले.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
  • मशिदीसमोरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका गेल्यावर त्यांच्यावर होणारी आक्रमणे हे धर्मांध उद्दाम झाल्याचे द्योतक असून हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !