
ठाणे, ३० सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. कळवा परिसरात ठेकेदाराने कृत्रिम तलावाऐवजी लोखंडी टाक्यांची उभारणी केली आणि देयके मात्र कृत्रिम तलावाचे सादर केल्याचा आरोप येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. या प्रकरणी पाचंगे यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
१. कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत खाडीकिनारी असलेल्या निसर्ग उद्यान परिसरात श्री गणेशमूर्ती विसर्जनाकरिता १८ लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्याचे काम ठेकेदाराला दिले होत; मात्र या ठेकेदाराने कृत्रिम तलावाच्या ऐवजी तिथे लोखंडी टाक्या बसवल्या. आता या ठेकेदाराने कृत्रिम तलाव बनवल्याचे भासवून ठाणे महानगरपालिकेला देयक सादर केले आहे. महापालिकेला बोगस देयके सादर केल्याच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. पुन्हा असाच घडलेला प्रकार संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला आहे.
२. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि महानगरपालिकेची फसवणूक करणार्या संबंधित ठेकेदारासह दोषी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनाग्रा यांच्याकडे केली आहे.
संपादकीय भूमिका
|
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !