६० लाख हेक्टरवर हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज !

मुंबई – ३० सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. दिवाळीपूर्वी शेतकर्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न राहील. ‘ओला दुष्काळ’ घोषित करायचा अर्थ असतो की, त्या सवलती लागू करा. ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पनाच नाही, तरीही तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.
राज्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकर्यांची पिके पाण्यात गेली आहेत.
फडणवीस या वेळी म्हणाले की, ६० लाख हेक्टरवर हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण २ सहस्र ११५ कोटी रुपये शेतकर्यांना वितरित करण्याची कामे चालू केली आहेत. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे आढावा घेता येत नव्हता; म्हणून त्यांना अधिक वेळ दिला आहे. भूमी, विहिरी, घरे यांच्या संदर्भातील तातडीचे साहाय्य चालू केले आहे. हानीविषयी साहाय्य करण्याविषयीची धोरणे आम्ही लवकरच घोषित करत आहोत.
राज्याची ‘जीसीसी पॉलिसी’ (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर) निश्चित करण्यात आली आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. पुढील काळात जगातून देशात ५ सहस्र ‘जीसीसी’ येणार आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारे धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !