
‘आय लव्ह महंमद’च्या फलकाचे प्रकरण उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये चालू होऊन आज महिना व्हायला आला. त्याची आग पेटत आता महाराष्ट्रात येऊन पसरली. तेथील बरेली, मऊ यानंतर शेवटी अहिल्यानगर येथे दंगल घडली. पुणे, मुंब्रा (जिल्हा ठाणे), तसेच भायखळा, भेंडीबाजार, अली रोड अशी मुंबईच्या मुसलमानबहुल ठिकाणीही आता फलक लागले आहेत. ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर भायखळ्यात अरेरावी करण्यात आली. धर्मांध त्यांच्यावरच दंगल भडकवण्याचा आरोप करू लागले. ‘तुम्ही हे फलक दाखवायला लावले आहेत, तर का अडवत आहात ? आणि यातून दंगल होईल, असे वाटते, तर ते का लावले आहेत ?’, असे चपखल उत्तर देऊन पत्रकाराने त्यांची बोलती बंद केली, तरी मग्रूर धर्मांध कुणाला काय बधणार ? यावर कहर आता मुंबईतील कुर्ला येथील व्हिडिओने केला आहे. ‘सिग्नल’ला थांबलेल्या वाहनांवर धर्मांध गटाने येऊन सरसकट सर्वांच्या वाहनांवर ‘आय लव्ह महंमद’चे ‘स्टिकर’ लावत आहेत आणि हिंदू ते लावून घेत आहेत. गटाने आलेल्या धर्मांधांपेक्षाही हिंदू खरेतर अधिक आहेत; पण कुणीही त्याला विरोध करत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. तसे करण्याचे धैर्य हिंदूंमध्ये का नाही ? तो स्वाभिमान आणि धर्माभिमान का नाही ? फलकाची लढाई आता ‘रस्त्यावरची लढाई’ झाली आहे. मऊ येथे झालेल्या दंगलीत सर्वच १६ ते २० वर्षांची मुले दिसली. काहींना वाटत आहे की, भारतातील ‘जेन झी’ (वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) देशभावनेच्या मुशीतून आल्यामुळे भारताला उपद्रवी आंदोलकांची चिंता नाही. ती गरबा खेळण्यात आणि भ्रमणभाषमधील मनोरंजनात रमल्याने खरोखरच भारताला ती चिंता नाही; मात्र भारतातील या बाधित ‘जेन झी’चे काय करायचे ? हे कुठेतरी प्रशासनाने ठरवण्याची हीच वेळ आहे. नमाजानंतर दंगली होणे, त्या पूर्वनियोजित असणे, त्यात तौकीर रझासारख्या तत्सम नेत्यांनी आवाहन करणे आदी सर्व पुन्हा पुन्हा घडणार्या गोष्टी हिंदूंना भयाच्या सावटाखाली जगणे भाग पाडत नाहीत काय ? अजूनही माध्यमे याच्या खोलात जात नाहीत आणि हे लावून धरत नाहीत. अहिल्यानगरमध्ये हे बंड पोलिसांनी बर्यापैकी मोडून काढले, तरी धर्मांध शेजारीपाजारी डोके वर काढणार नाहीत, याची निश्चिती नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री याविरोधात जोरकसपणे बोलतात, हा तेथील पीडित आणि भयग्रस्त हिंदूंसाठी एक आशेचा किरण आहे. त्यामुळेच तेथील जनतेनेही त्यांना तेवढीच साथ दिली आहे. त्यांनी मशाली घेऊन ‘आम्ही तुमच्या समवेत आहोत, तुम्ही पुढे चला’, अशा घोषणा देत फेरी काढून त्यांना पाठिंबा दिला आहे. यातून संघटनही दिसून आले, हिंदूंचा आत्मविश्वास दिसून आला आणि मुख्य म्हणजे सरकार अन् हिंदू दोन्ही एकत्र असल्याचे जाणवल्याने सत्तेच्या हातात असलेली यंत्रणा अन् व्यवस्था ज्यांच्यासाठी राबवायची, त्यांचे बळ यांचे एकत्रीकरण दिसून आले. त्याची एक जरी गोष्ट वेगळी पडली, तरी ते देशद्रोह्यांच्या पथ्यावर पडते. महाराष्ट्रात पहिल्या दिवशी जिथे फलक झळकले, त्यावर लगेचच प्रशासनाने काही धोरणात्मक आदेश काढले असते, तर एक प्रकारचा वचकही राहिला असता आणि कुर्ल्यासारखी कृती झाल्यावर तात्काळ काही कारवाई करणे शक्य झाले असते. आज वाहनावर स्टिकर लावणारे धर्मांध उद्या घराघरांवर हे स्टिकर लावणार नाहीत कशावरून ? ही एक प्रकारची बळजोरीच आहे. हिंदूंना राज्याच्या राजधानीत ती निपूटपणे सहन करावी लागत आहे. ही स्थिती हिंदूंच्या दृष्टीने धोकादायक !
‘आय लव्ह महादेव’चे स्टिकर लावा !

कुणी आपल्या श्रद्धास्थानाविषयी प्रेम व्यक्त करण्यात काही अडचण नाही; परंतु त्याला जाणूनबुजून दंगलीचे स्वरूप देऊन हिंदूंच्या विरोधात दहशत निर्माण करणे, हे हिंदूंनी किती दिवस सहन करायचे ? प्रत्येक वेळी निमित्त वेगळे आहे. अस्थिरता निर्माण करून हिंदूंना हानी पोचवणे, हा उद्देश साध्य होत आहे. याचे आर्थिक स्रोत कदाचित् शोधले जातीलही; पण अधिक मुळाशी जाऊन आर्थिक स्रोत, अशा प्रकारच्या मोहिमा राबवणार्या व्यक्ती आणि मधली माणसे शोधून त्या सर्वांवर तत्परतेने कडक कारवाई झाली, तर हे लोण पुढे पसरण्यापासून रोखण्यास साहाय्य होईल. सर्वत्र अशा प्रकारे वारंवार घडणार्या घटनांमुळे ‘हा बांगलादेश आहे कि काय ?’, असे कुठेतरी वाटू लागते. रस्त्यावरच्या या लढाईला तोंड देण्यासाठी हिंदू सिद्धतेत नाहीत, ही सत्य स्थिती आहे. दुर्दैवाने देवळांसमोरील भाविकांच्या रांगा या विखुरलेल्या हिंदूंचे निदर्शक आहेत. ना तिथे या धर्मांधांच्या झुंडीशी लढायचे प्रशिक्षण आहे, ना आत्मबल वाढवण्याचे ! हिंदूंचे नेते आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी निदान त्याला तोडीस तोड ‘आय लव्ह महादेव’चे आवाहन देऊन हिंदूंचे मनोबल वाढवले आहे. गांगरून किंवा भिऊन जाण्यापेक्षा निदान एक उपाय तरी पुढे ठेवला आहे; परंतु हिंदु असूनही किती हिंदूंमध्ये हिंदूंच्याच रिक्शांवर ‘आय लव्ह महादेव’चे स्टिकर लावण्याचे धैर्य आहे ? आणि किती हिंदू वरील बळजोरीच्या घटनेचा निषेध म्हणून ‘आय लव्ह महादेव’चे स्टिकर लावतील ? हिंदूंना जर त्यांचे अस्तित्व टिकवायचे असेल, स्वतःच्या वाहनावर ‘आय लव्ह महंमद’चे स्टिकर बळजोरीने लावून घेणे टाळायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या वाहनावर स्वतःहूनच ‘आय लव्ह महादेव’चे स्टिकर लावावेत. कुर्ला येथील घटनेचे अनुकरण देशात अन्यत्रही होऊ शकते. उद्दाम धर्मांधांच्या एका आक्रमणाला हिंदूंनी त्यांची लोकसंख्या बघता एवढ्या जोरकसपणे प्रत्युत्तर देण्याची (म्हणजे निदान स्टिकर लावण्याची) क्षमता तरी निर्माण करणे आवश्यक आहे.
‘अस्मानी सुलतानी’ !
मुळात कुर्ला येथील घटना ही कुणालाही किरकोळ किंवा साधी वाटू शकते. केवळ ‘स्टिकर लावल्याने काय होणार आहे ?’, असेही अस्मिताहीन हिंदू विचारू शकतात; परंतु बळजोरीने अशा प्रकारचे स्टिकर अत्याचारी समुदायाकडून लावून घेणे, हे बलात्कारापेक्षा अल्प नव्हे ! कदाचित् कुणाला ही अतिशयोक्ती वाटेल; परंतु खर्या भक्ताला किंवा धर्माभिमानी हिंदूला तुम्ही याविषयी विचारा. कुणाला असे िस्टकर वाहनावर मिरवायला आवडेल ? ही घटना पाहून बंगालमध्ये स्त्रियांवर अत्याचार करतांना त्यांच्या अंगावर काही गोंदण्याच्या घटना घडल्या होत्या, त्याची आठवण होते. हिंदूंच्या वाहनांवर धर्मांधांकडून हे ‘गोंदणे’ होऊ द्यायचे नसेल, तर हिंदूंना आणखी जागृत करण्याची आवश्यकता आहे. शासन आणि प्रशासन यांचेही दायित्व या घटना रोखण्याच्या संदर्भात वाढले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आज महाराष्ट्रावर खरोखरच ‘अस्मानी’ (आभाळाचे) संकट कोसळले आहे आणि राज्यातील केवळ या महिन्यातील अशा अनेक घटनांची उदाहरणे देता येतील, ज्यावरून ‘सुलतानी’ संकटही कोसळले आहे, हे लक्षात येईल. दोन्ही संकटांना ‘छत्रपती’ कसे सामोरे गेले असते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी याला सामोरे गेले पाहिजे !
| मावळ्यांनो, ‘सुलतानी’ संकटाला सामोरे जाण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून सज्ज व्हा ! |
संपादकीय : हरवलेले समाधान !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक