‘हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड’समवेत ६६ सहस्र कोटी रुपयांचा करार

नवी देहली – भारतीय वायूदलाने ‘हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड’ (एच्.ए.एल्.) आस्थापनाकडून ९७ ‘तेजस मार्क-१ ए’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. हा करार ६६ सहस्र ५०० कोटी रुपयांचा असून वायूदलाने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा व्यवहार आहे.
✈️ Indian Air Force to buy 97 new Tejas fighter jets!
💰 Deal worth ₹66,500 crore signed with Hindustan Aeronautics Ltd (HAL) — IAF’s biggest ever purchase.
🔁 To replace 36 ageing MiG-21s exiting service.
📉 IAF currently short on fighters — needs 40 jets/year, says Air… pic.twitter.com/K74IilxOOO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 25, 2025
१. वायूदलाकडे असलेली ३६ जुनी ‘मिग २१’ विमाने सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली लढाऊ विमानांची तूट भरून काढण्यासाठी हा करार करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. एअर मार्शल ए.पी. सिंह यांनी अलीकडेच ‘भारतीय वायूदल लढाऊ विमानांच्या संदर्भात कमकुवत स्थितीत आहे. वायूदलाला प्रतिवर्षी ४० नव्या लढाऊ विमानांची आवश्यकता आहे’, असे म्हटले होते.
२. सध्या भारताकडे केवळ २९ ‘फायटर स्क्वाड्रन्स’ (१७ ते १८ लढाऊ विमानांची एक तुकडी, याप्रमाणे २९ तुकड्या) आहेत. चीन किंवा पाकिस्तानचा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास भारताला ४२ ‘स्क्वाड्रन्स’ही पुरेसे नाहीत. त्यामुळे अधिकाधिक लढाऊ विमाने मिळावीत, ही मागणी वायूदलाने सातत्याने लावून धरली आहे. ही मागणी आता काही अंशी पूर्ण होणार आहे.
३. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये ४६ सहस्र ९८९ कोटी रुपयांमध्ये ८३ ‘तेजस मार्क-१ए’ विमानांच्या खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२८ या काळात एच्.ए.एल्.कडून वायूदलाला विमाने दिली जाणार आहेत. ‘या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारतीय वायूदलाकडे २ तेजस विमाने सुपुर्द केली जातील’, असे एच्.ए.एल्.ने म्हटले आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण