|

कुडाळ – शहरातील पानबाजार येथील बाबाचांद दर्ग्यावर (मशिदीवर) असलेला आणि गेले काही महिने बंद असलेला ध्वनीक्षेपक (भोंगा) २१ सप्टेंबर २०२५ या दिवशी पहाटे अचानक चालू करण्यात आला. कुणाच्या सांगण्यावरून हा भोंगा चालू झाला ? हा ‘ध्वनी जिहाद’ हिंदूंचा छळ करण्यासाठीच चालू आहे का ? मशिदीवर मोठ्याने वाजणार्या भोंग्यामुळे हिंदूंनाच नव्हे, तर सर्वच धर्मांतील, जातींतील व्यक्तींना त्रास होतो. हा छळ नेमका कशासाठी ? काय साध्य करायचे आहे ? किती सहन करायचे ? कि आम्ही हिंदूंनी पानबाजार येथून पलायन करायचे ?, असे अनेक प्रश्न उपस्थित करत ‘माझा कुणी मुडदा पाडला, तरी चालेल; मात्र त्या मशिदीवरील भोंगा कह्यात घेतला पाहिजे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून भोंगे लावणार्या संबंधितांवर रितसर प्रथमदर्शनी गुन्हा नोंद झालाच पाहिजे, अशी मागणी येथील बाळा राणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.
शहरातील पानबाजार येथील बाबाचांद दर्गा, तसेच अन्य ठिकाणी असलेल्या मशिदी यांमधून मोठ्या आवाजात वाजणार्या भोंग्यांचा आवाज न्यून व्हावा, यासाठी आजपर्यंत पोलीस ठाण्यात निवेदने दिली. वर्ष २००७ पासून आज वर्ष २०२५ म्हणजे गेली १८ वर्षे मी हे सहन करत आहे. पोलिसांनी त्या त्या वेळी केलेल्या विनंत्यांवरून हे मी सहन केले आहे. या कालावधीत कुडाळ पोलीस ठाण्याच्या १३ पोलीस निरीक्षकांनी सहकार्य करत तातडीने कायदेशीर कार्यवाही करणे चालू केली होती; मात्र काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांनी पुन्हा या मशिदीवर मोठ्या आवाजात भोंगा चालू झाला. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करून मलाच, ‘तुम्हाला आवाजाचा त्रास होतो, तर दुसर्या ठिकाणी जाऊन का रहात नाही ?’, असा प्रतिप्रश्न केला.’ (अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर एक दिवस सर्व हिंदूंना भारत सोडून जायला सांगितले जाईल. – संपादक) आजवर जे सहन केले, ते आता मर्यादेच्या पलीकडे गेल्याने या भोंग्याच्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी असल्याचे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची प्रत केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्व प्रसिद्धीमाध्यमे, संबंधित शासकीय विभाग यांना पाठवल्याचे राणे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
हुसेन जैनुद्दीन मुजावर याच्यावर गुन्हा नोंद
कुडाळ पानबाजार येथील बाबाचांद मशीद येथे पहाटे ५.२० वाजण्याच्या दरम्यान अजान चालू ठेवून ध्वनीक्षेपकासाठी दिलेल्या अनुमतीच्या अटी शर्तीचा भंग केल्याच्या प्रकरणी हुसेन जैनुद्दीन मुजावर (रहाणार पानबाजार, कुडाळ) याच्यावर कुडाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला. याविषयीची तक्रार साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता