तुळजाभवानी मंदिरातील दर्शन शुल्कवाढ रहित करण्यासाठी मंदिर महासंघाचे निवेदन !

तहसीलदार माया माने यांना निवेदन देतांना देवीभक्त

तुळजापूर, २१ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’ यांना नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेल्या दर्शन शुल्कवाढीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. श्री तुळजाभवानी, या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची ओळख असलेल्या देवीच्या नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे येतात; मात्र यंदा मंदिर संस्थानने घेतलेल्या अन्यायकारक दर्शन शुल्कवाढीमुळे भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

या निर्णयाच्या विरोधात तुळजापूर येथील पुजारी मंडळ, देवीभक्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मंदिराच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी स्वीकारले. निवेदनावर मंदिर महासंघाचे श्री. किशोर गंगणे, सर्वश्री विनोद रसाळ, अमित कदम, सर्वोत्तम जेवळीकर, अर्जून आप्पा साळुंखे तसेच तुळजापुरातील अनेक मान्यवर पुजारी आणि व्यापारी बांधव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संपादकीय भूमिका :

असे निवेदन का द्यावे लागते ? मंदिर संस्थानला ते लक्षात येत नाही का ?