
पितरांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे जी लाभावयाची ती गती लाभलेली असणारच; पण तेथे जे भोग त्यांच्या वाट्याला येत असतील, त्यात त्यांच्यासाठी कृतज्ञतापूर्वक केलेल्या श्राद्धादी कृत्यांचा त्यांना लाभ होतो, हे मान्य करण्यास अडचण असू नये. ‘परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ११), म्हणजेच ‘निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल’, हाच शास्त्राचा सिद्धांत आहे. तेच सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, हे आपण आधी विचारात घेतले आहेच. श्राद्धादी सत्कर्मांतून पुण्य निर्माण होते आणि संकल्पाप्रमाणे त्याचा लाभ पितरांना मिळतो. वडिलांनी आपल्यासाठी पुष्कळ केले आहे, ही जाणीव ठेवणे आणि कृतज्ञताबुद्धीने त्यासाठी त्यांना परलोकीही अनुकूलता लाभेल, अशा गोष्टी करणे, हे वंशजांच्या सुसंस्कृतपणाचे, चांगुलतेचे लक्षण आहे. आता आमच्या बापाने आमच्यासाठी काय केले, असे निर्लज्ज उद्धटपणाने विचारणारीही काही मुले असतात. त्यांना काय सांगणार ?
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘गीताप्रवेश’)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !