
२१ जून या दिवशी मुंबईतील ‘बेस्ट’ बसच्या कामगारांनी मागण्या मान्य करून घेण्याकरता संपाचे हत्यार उपसले आणि याच दिवशी बहुचर्चित अशी ‘नीट’ची पुनर्परीक्षा होती. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेचा दिवस असल्याने बेस्ट बसच्या कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्याकरता अतोनात त्रास सहन करावा लागला. टॅक्सी आणि रिक्शा चालकांनी याचा अपलाभ उठवत मनमानी भाडे वसूल केले. बेस्टच्या कर्मचार्यांनी २२ जून या दिवशी सकाळी संप मागे घेतला. पुनर्परीक्षेच्याच दिवशी संपाचे हत्यार उगारून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यामागे संपकर्यांचा नेमका उद्देश काय होता ? याकडे सरकारने गांभीर्याने बघायला हवे.
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई
हिंदु धर्माची महानता !
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !