|

फोंडा (गोवा) – अमेरिकी आस्थापन ‘परप्लेक्सिटी एआय’ या संकेतस्थळावरील शोध इंजिनच्या विज्ञापनात भारताचा चुकीचा नकाशा प्रसारित करण्यात आला आहे. यात पाकव्याप्त काश्मीर हा महत्त्वाचा भाग वगळण्यात आला आहे. हे विज्ञापन हिंदीमध्ये भारतात प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतियांकडून सामाजिक माध्यमांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात सनातनचे साधक श्री. नीलेश चितळे यांनी ‘परप्लेक्सिटी एआय’ आस्थापनाला पत्र पाठवून या चुकीची जाणीव करून दिली. त्यावर आस्थापनाकडून याची पडताळणी केली जात असल्याचे उत्तर पाठवण्यात आले.
🇺🇸 Perplexity AI sparks outrage in India!
🔹 Sanatan seeker Nilesh Chitale flagged the Hindi ad showing India’s map without PoK
🔹 Company responded: “We’re verifying”
⚠️ Foreign firms repeatedly insult India’s sovereignty. Govt must ban those distorting maps & protecting… https://t.co/q0CEEmfV7t pic.twitter.com/Dj5PdywGkN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 22, 2025

श्री. चितळे यांना दिलेल्या उत्तरात आस्थापनाच्या सॅम नावाच्या अधिकार्याने म्हटले की, तुम्ही या महत्त्वाच्या घटनेकडे आमचे लक्ष वेधून दिल्यासाठी धन्यवाद. आमच्या विज्ञापनातील नकाशाच्या सादरीकरणाशी संबंधित ही समस्या तुम्ही कळवल्यासाठी मी आभारी आहे. तुमचा अभिप्राय मी आमच्या पथकाकडे तात्काळ तपासणीसाठी पाठवला आहे. आमच्या सहकार्यांपैकी एक याची छाननी करून आवश्यक ती कार्यवाही करेल. पुढे यात आस्थापनाने असेही म्हटले आहे की, कृपया लक्षात ठेवा की, तुम्ही दिलेल्या आणखी प्रतिसादांमुळे तुमची विनंती सूचीच्या शेवटी जाईल आणि उत्तर मिळण्यास विलंब होऊ शकतो.
संपादकीय भूमिकादेशाच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्या आस्थापनावर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे ! |
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !