श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री सरस्वतीमाता यांच्या संदर्भात पू. (सौ.) अश्विनी पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेली दैवी अनुभूती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी परिधान केलेल्या अनुक्रमे लाल अन् हिरवा काठ असलेल्या पांढर्‍या रंगाच्या साड्या. (वर्ष २०२२)

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या ३३ व्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी श्री सरस्वतीमातेच्या वस्त्राप्रमाणे पांढर्‍या रंगाच्या साड्या परिधान करणे

‘२०.११.२०२२ (कार्तिक कृष्ण एकादशी) या दिवशी माझा ३३ वा वाढदिवस होता. या दिवशी मी रामनाथी आश्रमात होते. मी सकाळपासून पांढर्‍या रंगाची आणि हिरवे काठ असणारी साडी परिधान केली होती. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सायंकाळी मला त्यांच्या खोलीत भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी त्यांनी पांढर्‍या रंगाची आणि लाल काठ असणारी साडी परिधान केली होती. ‘पांढरा रंग आणि लाल किंवा हिरवे काठ असलेली साडी’, हे श्री सरस्वतीमातेचे वस्त्र आहे. आम्ही दोघींनी एकाच दिवशी अशाच प्रकारच्या साड्या नेसल्या होत्या. त्या दिवशी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली.

२. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना दिलेले श्री सरस्वतीमातेचे ‘एम्बॉस्’ केलेले (सुवर्ण कडांनी धातूमध्ये कोरलेले) चित्र श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी आश्रमात नेणे आणि त्यांनी ते चित्र पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना परत देणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना दिलेले श्री सरस्वतीमातेचे ‘एम्बॉस्’ (सुवर्ण कडांनी धातूमध्ये कोरलेले) केलेले चित्र

सप्टेंबर २०१९ मध्ये श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई देवद आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी मला दिलेले श्री सरस्वतीमातेचे ‘एम्बॉस्’ केलेले चित्र श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांनी एका सेवेत चैतन्य मिळण्यासाठी वापरले. त्या सेवेच्या वेळी या चित्रावर मोठ्या अनिष्ट शक्तींनी आक्रमण केले होते. त्यानंतर त्या चित्रावरील त्रासदायक नकारात्मक शक्तीचे आवरण दूर होण्यासाठी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांनी ते चित्र रामनाथी आश्रमात नेले. त्यांनी ते चित्र चैतन्याने पुनर्भारित करण्यासाठी यज्ञस्थळी ठेवले. माझ्या ३३ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ते श्री सरस्वतीमातेचे चित्र मला परत दिले.

३. ‘आम्ही दोघींनी श्री सरस्वतीमातेच्या वस्त्राप्रमाणे साडी परिधान करणे आणि त्याच दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेले श्री सरस्वतीमातेचे चित्र मला परत मिळणे’, ही घटना म्हणजे एक दैवी योग आहे’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री सरस्वतीमाता यांच्या कृपेमुळे मला आलेली ही एक दैवी अनुभूती आहे. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक