श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या भावपूर्ण वाणीमुळे भावस्थिती अनुभवणे !

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी भ्रमणभाषवर निरोप देणे आणि तो ऐकून आपोआप भावस्थिती अनुभवणे : एके दिवशी एक निरोप देण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी मला भ्रमणभाषवर संपर्क केला. त्यांचा निरोप सांगून झाल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. एरव्ही भावजागृतीसाठी प्रयत्न केल्यावर किंवा भावाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न केल्यावर माझी भावजागृती होते; पण या प्रसंगामध्ये ज्या प्रकारे भाव जागृत झाला, तो मला पुष्कळ वेगळा वाटला. काही प्रयत्न न करता केवळ एक निरोप ऐकून किंवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा आवाज ऐकून अकस्मात् एवढा भाव जागृत होणे, असे माझ्या संदर्भात पहिल्यांदाच झाले होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी नामजपाविषयी केलेले मार्गदर्शन आठवून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा केवळ आवाज ऐकून भावजागृती होण्यामागील कारण समजणे : दुसर्या दिवशी ‘या भावजागृतीमागे काय कारण असू शकते ?’, याचे मी चिंतन करतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘नामजप कसा असावा ?’ आणि ‘नामात काय असावे’, यांविषयी एका साधिकेला केलेले मार्गदशन आठवले. त्यांनी साधिकेला सांगितले होते की, ‘नामजप करतांना आपल्यात एवढा भाव असला पाहिजे की, आपला नामजप ऐकूनच समोरच्याचीही भावजागृती झाली पाहिजे !’ त्यांचे हे मार्गदर्शन आठवल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा आवाज ऐकूनच माझी भावजागृती होण्यामागील कारण समजले. त्यांच्यामध्ये एवढा भाव आहे की, त्यांचा आवाज ऐकूनच ऐकणार्याची भावजागृती होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मला अनुभूती घेता आली, यासाठी मी कृतज्ञ आहे.
– श्री. मेहूल राऊत. (३.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !