रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या आणि सूक्ष्म-चित्रे काढणार्या एका विदेशातील साधिकेची ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झालेली भेट, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी साधिकेला एक चित्र काढण्याविषयी केलेले मार्गदर्शन, भावचित्र रेखाटतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, भावचित्राचे वर्णन आणि ते काढतांना आलेली अनुभूती’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

१. साधिकेची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झालेली भेट !
१ अ. आश्रमातून विदेशात निघण्यापूर्वी साधिकेची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भेट होणे आणि साधिकेने त्यांना स्वतः बनवलेले फूल देणे : ‘कोरोना महामारीच्या काळात चालू झालेले ‘लॉकडाऊन’ नोव्हेंबर २०२१ मध्ये संपले आणि मी रामनाथी (गोवा) येथील आश्रमातून विदेशात माझ्या घरी परत निघाले. मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले होते. त्यामुळे मी निघण्यापूर्वी माझी भेट श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झाली. ही भेट अतिशय आनंददायी होती. या भेटीत त्यांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन केले. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना गुलाबी आणि पांढर्या रंगांच्या मण्यांपासून बनवलेले एक फूल दिले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झालेले संभाषण
१ आ १. साधिकेने दिलेले फूल पाहून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘हे फूल म्हणजे तू असून तुझ्यातील गुणांचे हे प्रतीक आहे’, असे सांगणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : हे कोणते फूल आहे ?
साधिका : हे तुमच्यासाठी आणले आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : (काही वेळ त्यांनी फूल हातात धरले.) हे फूल म्हणजे तू आहेस. तुझ्यातील गुणांचे हे प्रतीक आहे. या फुलात गुलाबी आणि पांढरा रंग आहे. पांढरा रंग शुद्धता दर्शवतो, तर गुलाबी रंग हे प्रेमाचे प्रतीक आहे.
१ आ २. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला ‘गुरुदेवांच्या चरणांवर आपण डोके ठेवून नमस्कार करत आहोत’, असे चित्र रेखाटण्यास सांगणे
साधिका : मी जर हे फूल आहे, तर मला तुमच्या चरणांशी रहायला आवडेल. (मी ते फूल श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणांवर ठेवले.)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : नको. आपण दोघीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांशी असलेल्या शिष्या आहोत. ‘तू आणि मी गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करत आहोत’, असे एक चित्र रेखाट. ‘आपण एकमेकींचे हात धरले आहेत’, हेही त्या चित्रात दाखव. त्या चित्रात आपल्या समवेत सर्व साधकही असतील. सर्व साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांशी असतील !
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी साधिकेला आध्यात्मिक लाभासाठी फूल परत देणे
पाच मासांनी मी पुन्हा रामनाथी आश्रमात आले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी ते फूल मला आध्यात्मिक लाभासाठी म्हणून परत दिले. मी ते फूल माझ्या गळ्यातील साखळीत घातले.
३. देवाचे साहाय्य घेऊन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे रेखाटलेले भावचित्र !
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी मला चित्र रेखाटायला सांगितले. तेव्हा त्यांना अपेक्षित असे चित्र काढण्याचा मी प्रयत्न करत होते.
आ. आरंभी मी चित्रात साधकांना स्थुलातून दाखवले; मात्र ‘देवाला हे अपेक्षित नाही’, असे मला जाणवले. त्यामुळे ‘देव मला काय दाखवू इच्छितो ?’, हे मी सूक्ष्मातून पहाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला संपूर्ण पृथ्वी दिसली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवरील सर्व साधकांचे गुरु आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. मला सूक्ष्मातून जसे दृश्य दिसले, त्यानुसार मी चित्र रेखाटले.
इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वंदन करत आहोत आणि अन् एकमेकींचा हात धरला आहे’, असे चित्र रेखाटण्याचा मी प्रयत्न करत होते; परंतु ‘चित्रात ती रचना कशी दाखवावी ?’, हे मला समजत नव्हते. त्यामुळे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी माझ्या पाठीमागून मला धरले आहे’, असे मी चित्रात दाखवले. चित्र अधिक चांगले बनण्यासाठी मला त्यात काही पालट करावे लागले.
४. भावचित्राचे वर्णन
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांशी बसलो आहोत. ‘गुरुदेवांच्या चरणी शरणागत कसे रहायचे ?’, हे त्या मला शिकवत आहेत. मी ‘गुरुदेवांच्या चरणांवर नतमस्तक होत आहे ना ?’, याची त्या निश्चिती करत आहेत. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे मार्गदर्शन आणि प्रीती पाहून मी कृतज्ञतेने भारावून गेले.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण व्यापक स्वरूपात असून ते संपूर्ण ब्रह्मांडात व्यापले आहेत.
इ. गुरुदेवांच्या चरणांतून चैतन्य प्रवाहित होत आहे.
ई. जगभरातील सर्व साधक पृथ्वीवर चमकणार्या दिव्यांप्रमाणे दिसत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांतून येणार्या चैतन्याने सर्व साधक न्हाऊन निघाले आहेत.
उ. आम्हा सर्वांभोवती भाव आणि आनंद यांची वलये सिद्ध झाली आहेत.
५. अनुभूती – पूर्वी स्वतःचे चित्र रेखाटतांना मनात नकारात्मक विचार येणे; मात्र या वेळी नकारात्मक किंवा सकारात्मक, असे कोणतेच विचार मनात न येणे
हे भावचित्र रेखाटतांना मी माझे चित्रही रेखाटत होते. त्या वेळी मला ‘मी माझे चित्र रेखाटत आहे’, असे न वाटता ‘मी अन्य कुठल्या तरी साधिकेचे चित्र रेखाटत आहे’, असे वाटत होते. यापूर्वी मी जेव्हा माझे चित्र रेखाटले होते, तेव्हा माझ्या मनात स्वतःविषयी अनेक नकारात्मक विचार आले होते; मात्र या वेळी नकारात्मक किंवा सकारात्मक, असे कोणतेच विचार माझ्या मनात आले नाहीत. हे भावचित्र परिपूर्ण होण्याकडेच माझे सर्व लक्ष केंद्रित झाले होते.’
– एक साधिका (वर्ष २०२५ ची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आणि वय २७ वर्षे), विदेश (१६.१०.२०२३)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !