‘७.९.२०२५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांनी पितृपक्षानिमित्त ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप प्रतिदिन १ घंटा करावा’, असे प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार साधिका नामजप करत असतांना तिला सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्याविषयी पुढे दिले आहे.

१. ‘८.९.२०२५ या दिवशी पितृपक्ष चालू झाला. त्या दिवशी मी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप करण्यापूर्वी दत्तगुरूंना प्रार्थना करायला आरंभ केला. तेव्हा मला सूक्ष्मातून माझे आई-बाबा दिसले.

२. मला सूक्ष्मातून दिसले, ‘आईने जी साडी नेसलेली मला आवडत असे, तीच साडी आई नेसली आहे. आई-बाबा दोघेही पुष्कळ आनंदी आणि समाधानी आहेत.
३. मी त्यांना प्रथम भावपूर्ण नमस्कार केला. मी काही बोलण्यापूर्वीच आई म्हणाली, ‘आम्ही तुला आशीर्वाद द्यायला आलो आहोत. कुळातील एक व्यक्ती जरी साधना करत असली, तरीही संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. ‘तू साधना करत आहेस’, हे पाहून आम्ही पुष्कळ समाधानी आहोत आणि आम्हाला कृतज्ञता वाटते.’ नंतर ते दोघे दिसेनासे झाले.
४. हे सगळे अनुभवल्यावर ‘गुरुतत्त्व प्रत्येक क्षणी आपली किती काळजी घेते ! गुरुतत्त्व केवळ आपलीच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि कूळ यांची काळजी घेते’, हे पाहून माझ्या मनात गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ कृतज्ञता दाटून आली.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२५)
|
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !