
१. ‘पाटणा (बिहार) येथील पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचिकेने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण (‘ऑनलाईन’) पाहिले. त्यांना हा महोत्सव अतिशय चांगला वाटला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून त्यांना पुष्कळ प्रेरणा मिळाली. त्यांनी कार्यक्रम पाहिल्यानंतर त्वरित अर्पण दिले.
२. सनातन संस्थेचे व्यापक कार्य त्या वाचिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यामधील ‘सनातन प्रभात’चे वितरण करणार्या साधिकेच्या प्रतीच्या भावत वृद्धी झाली. यापूर्वी जेव्हा ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारी साधिका अंक देण्यासाठी त्या महिलेच्या घरी जात असे, तेव्हा त्या जिना उतरून खाली येत नसत. त्या महिलेने महोत्सवाचे प्रक्षेपण पाहिल्यानंतर ती महिला स्वतःहून ‘सनातन प्रभात’चा अंक घेण्यासाठी खाली आली.
३. त्या वाचिकेला महाधन्वन्तरि यागाचा प्रसाद देतांना त्यांनी दोन्ही हातांनी ओंजळ करून तो प्रसाद स्वीकारला आणि तो स्वतःच्या हृदयाशी ठेवून नमस्कार केला.
४. ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारी साधिका वाचिकेच्या घरात असेपर्यंत ती वाचिका भावावस्थेत होती.
५. ‘सनातन प्रभात’च्या अंकातील ‘सनातन राष्ट्रध्वजा’चे चित्र पाहून महिला वाचकांनी त्या ध्वजाला नमस्कार करून अंक घेतला.’
– श्रीमती सुनीता सिंह, पाटणा, बिहार. (२६.५.२०२५)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !