
आळंदी (पुणे) – येथील फ्रूटवाले धर्मशाळा येथे २० सप्टेंबरला सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सनातन विद्या फाऊंडेशन, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि स्वराज्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देहू अन् आळंदी येथील विविध वारकरी शिक्षण संस्थांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाय, तसेच देव, देश, धर्म यांवर होणारे आघात अणि त्यांवर उपाय आदींविषयी या संमेलनात चर्चा होईल. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनात मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते आणि त्यांचे विषय !
१. डॉ अंकुश आगरवाल, हिंदु जागरण (विषय : भारताची आंतरिक सुरक्षा तथा समस्या आणि उपाय)
२. श्री. अविनाश धर्माधिकारी, आय.ए.एस्. (विषय : सनातन धर्म आणि राष्ट्र उभारणीत वारकरी अन् धार्मिक शिक्षण संस्था यांचे योगदान आणि महत्त्व !)
३. श्री. संदीप लोहार महाराज (विषय : वारकरी आणि शिक्षण संस्था यांचे प्रश्न, आव्हाने आणि उपाय)
४. श्री. बाजीराव बांगर महाराज (विषय : वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्व)
५. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (विषय : हिंदु धर्माच्या विरोधात होणारे षड्यंत्र (फेक नॅरेटिव्ह))
६. श्री सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य (विषय : वारीतील डावे आणि शहरी नक्षलवादी यांची घुसखोरी)
या व्यतिरिक्त देहलीचे वरिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, अधिवक्त्या श्रीमती रोहिणी पवार, सी.ए. राम डावरे यांच्यासह गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे महाराज (मोठे माऊली), गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर कदम महाराज (छोटे माऊली), ह.भ.प. संग्राम बापू भंडारे आदी मान्यवर उपस्थित राहून संमेलनात मार्गदर्शन करतील.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !