लठ्ठपणावर नियंत्रण मिळवल्याने जपानचे सरासरी आयुर्मान अत्यंत चांगले !

टोकियो (जपान) – जपानच्या आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी देशात १०० वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धांची संख्या ९९ सहस्र ७६३ आहे. साधारण वर्ष १९६० पासूनची १०० वर्षे जगणार्या जपानी नागरिकांची ही एकूण संख्या आहे. यांत ८८ टक्के महिला आहेत. सर्वाधिक १०० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांच्या संख्येचा विचार करता जपानने सलग ५५ व्या वर्षी असा विक्रम केला आहे. ८७ सहस्र ७८४ महिला आणि ११ सहस्र ९७९ पुरुष १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगले.
💡 Want to reach your centenary? Learn from Japanese! 🇯🇵
In 65 yrs, nearly 1 Lakh reached 100+ (88% women).
This year → 52K centenarians 🎉
Secrets: low obesity, less salt/sugar, 3-min TV exercise habit.
🌏 Avg lifespan: 95.1 yrs (4th worldwide).
⚠️ Lesson: Discipline &… pic.twitter.com/Np0lhkl0JU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 15, 2025
आरोग्य मंत्री ताकामारो फुकुओका यांनी १५ सप्टेंबरला असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक दिना’च्या निमित्ताने हे आकडे १२ सप्टेंबरला प्रसारित केले. ज्येष्ठ नागरिक दिनी जपानी पंतप्रधान १०० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अभिनंदन पत्र आणि चांदीचा पेला भेट देतात. यंदा ५२ सहस्र ३१० ज्येष्ठ नागरिकांना हा सन्मान देण्यात येणार आहे.
१०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगलेल्या जपानी नागरिकांची संख्या !

(टीप : या सारणीचा अर्थ असा नाही की, आज १०० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जपानी लोकांची संख्या १ लाख आहे. गेल्या ६५ वर्षांमध्ये एवढ्या लोकांनी शंभरी गाठली, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. त्यांपैकी अनेक लोकांचे नंतरच्या काळात निधनही झाले आहे.)
लठ्ठपणाची समस्या अल्प असल्याने आयुर्मानही चांगले !
जपानमधील लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या अल्प आहे. त्यामुळे लोकांना हृदयरोग आणि कर्करोग यांसारखे आजार अल्प प्रमाणात होतात.
आयुर्मानात जपान चौथ्या क्रमांकावर !
जपानमधील आयुर्मान ९५.१ वर्षे इतके आहे. ही आकडेवारी पहाता जपान जगात चौथा देश आहे, जिथे लोकांचे आयुर्मान अधिक आहे. जपानमध्ये महिला पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात.
निरोगी देशांच्या सूचीत जपान दुसर्या क्रमांकावर !
‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू २०२५’च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वांत निरोगी देशांमध्ये जपान दुसर्या क्रमांकावर आहे. हा अहवाल आयुर्मान, लठ्ठपणा, मधुमेह, आनंद आणि आरोग्यावरील खर्चाच्या आधारे सिद्ध करण्यात येतो.
आयुर्मान वाढवण्यासाठी जपानी लोकांनी मीठ आणि साखर खाणे केले अल्प !१९६० च्या दशकापर्यंत जपानमधील सरासरी आयुर्मान ‘जी ७’मधील अन्य देशांपेक्षा अल्प होते. वर्ष १९६३ मध्ये सरकारने एक सर्वेक्षण केले. यामध्ये १५३ लोक १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्याचे आढळून आले. यानंतर सरकारने एक सार्वजनिक उपक्रमच हाती घेतला. लोकांना मीठ आणि साखर अल्प प्रमाणात खाण्याची जाणीव करून देण्यात आली. |
गरम शेक आणि गार शेक
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले