नंदुरबार येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विशेष व्याख्यान !

नंदुरबार – भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक खटल्यांमध्ये खर्या आरोपींना मोकाट सोडून विनाकारण निष्पाप हिंदूंना ज्यांनी ठार केले, अनेक हिंदु कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केली, त्या सर्वांचे कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत. सत्य सर्वांसमोर येणारच आहे, त्यामुळे भगव्या आतंकवादाचा बागूलबुवा पसरवून संपूर्ण हिंदु समाजाला अपकीर्त करणार्यांना हिंदु समाजच अद्दल घडवेल, यावर माझी ठाम श्रद्धा आहे, असे परखड विधान ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांनी केले. नंदुरबार येथील अग्रवाल भुवन येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आयोजित ‘भगव्या आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.
राज्य सरकारने हिंदूंना अपकीर्त करणार्यांवर कठोर कारवाई करावी ! – प्रशांत जुवेकर

वर्ष २००९ मध्ये गोवा येथे झालेल्या एका स्फोटात निर्दोष असतांनाही केवळ हिंदुत्वाचे कार्य करतो; म्हणून माझ्यासारख्या ५ जणांना अटक केली गेली. ४ वर्षे कारावास भोगल्यानंतर आमची निर्दोष मुक्तता झाली. माझ्यासारख्या अनेक निरपराध हिंदूंचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे पाप करणारे तत्कालीन हिंदुद्रोही शासनकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वर्तमान राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, तरच असे धाडस ते पुन्हा करणार नाहीत !
चोपडा येथेही व्याख्यान !
चोपडा (जिल्हा जळगाव) – येथेही हिंदु रक्षा समितीच्या वतीने अशा स्वरूपाच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. येथे ख्रिस्ती झालेल्या १६ आदिवासी कुटुंबांची घरवापसी करणार्या लोकांचा श्री. विक्रम भावे यांच्या हस्ते करण्यात आला होता.
विक्रम भावे आणि प्रशांत जुवेकर यांचा सत्कार !या वेळी नंदुरबार येथील राजस्थानी चौधरी समाजाचे ओमप्रकाश चुनीलाल आणि त्यांचे सहकारी, हिंदु सेवा साहाय्य समिती, ‘नंदुरबार जिल्हा बार असोसिएशन’चे अध्यक्ष आणि सर्व अधिवक्ता बांधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तळोदा तालुक्यातील हिंदु राष्ट्र सेना, जय श्रीराम सोशल ग्रुप, पतंजली परिवार यांच्या वतीने सर्वश्री विक्रम भावे आणि प्रशांत जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानानंतर अनेकांनी पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावरील अत्याचारांविषयी जाणून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित परदेशी यांनी केले आणि आभारप्रदर्शन श्री. सतीश बागुल यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ शेकडो धर्मप्रेमी नागरिकांनी घेतला. |
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !