१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. सौ. सुजाता शिंदे, राजगुरुनगर, पुणे.
१. ‘गुरुपौर्णिमेचा सोहळा अप्रतिम झाला. तेथील वातावरण पुष्कळ प्रसन्न वाटले. ‘सनातन संस्थेमध्ये साधकांच्या साधनेची किती काळजी घेतली जाते !’, हे मला शिकायला मिळाले.
२. अनुभवकथन ऐकतांना ‘साधनेमुळे आपल्यामध्ये परिवर्तन होते, तर आपणही साधना वाढवली पाहिजे’, हे मला शिकता आले.’
१ आ. सौ. अनघा पोतदार, कोथरुड, पुणे.
१. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला देवघर मांडणीची सेवा मिळाली. त्या सेवेतून ‘तेथे येणार्या जिज्ञासूंना माहिती कशी सांगायची ?’, हे मला शिकता आले.
२. ‘संघभावात राहून सेवा केल्याने अहं न्यून होण्यास साहाय्य होते आणि आनंद मिळतो’, हे मला शिकायला मिळाले.’
२. आलेल्या अनुभूती
२ अ. सौ. वर्षा दौंडकर, राजगुरुनगर, पुणे.
२ अ १. ‘मी मुलांना सांभाळतो, तू गुरुपौर्णिमेला जा’, असे यजमानांनी सांगितल्याने साधिकेला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाता येणे : ‘माझी मुले लहान असल्याने मला एकटीला बाहेर कुठे जाता येत नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या ८ दिवस आधीपासून मी गुरुदेवांना ‘मला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाता येऊ दे’, अशी प्रार्थना करत होते. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मी यजमानांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी मुलांना सांभाळतो. तू गुरुपौर्णिमेला जाऊन ये.’’ त्यामुळे मला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाता आले. गुरुदेवांनी ही अनुभूती दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
२ आ. सौ. अनघा पोतदार, कोथरुड, पुणे.
१. ‘मला दिवसभर पुष्कळ चैतन्य जाणवत होते.’
२ इ. सौ. अंजली नामजोशी, कोथरुड, पुणे.
१. ‘सभागृहात प्रवेश करताक्षणीच गुरुपूजनाचे दर्शन झाल्याने माझे मन एकदम शांत आणि स्थिर झाले. मला पुष्कळ एकाग्रता जाणवली.
२. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची ध्वनी-चित्रचकती (व्हिडिओ) पाहून माझे मन अगदी भारावून गेले. ‘आपण प्रत्यक्षात सोहळ्यामध्ये आहोत’, अशी अनुभूती मला आली.
३. श्रीरामाचा नामजप करतांना माझे मन स्थिर झाले. त्या दिवसापासून माझ्या नामजपामध्ये वाढ झाली आहे. माझ्याकडून गुणात्मक नामजप करण्याचा प्रयत्न होत आहे.’
२ ई. सौ. स्वप्नाली गळवे, चिंचवड, पुणे.
२ ई १. यजमान आणि एक साधिका यांनी साहाय्य केल्याने कार्यक्रमाचा लाभ घेता येणे : ‘मला डोकेदुखीचा तीव्र त्रास आहे, तसेच माझी मुले लहान असल्याने ‘ती कार्यक्रमात बसू शकतील का ?’, असा विचार माझ्या मनात येत होता; मात्र माझे यजमान आणि एक साधिका यांच्यामुळे मला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा लाभ घेता आला.’
२ उ. श्रीमती ज्योती नारखेडे, चिंचवड, पुणे.
२ उ १. गुरुदेवांना प्रार्थना केल्याने पारपत्राचे काम वेळेत पूर्ण होऊन गुरुपूजनाला वेळेत उपस्थित रहाता येणे : ‘गुरुपौर्णिमेच्या काळात माझे पारपत्र (‘पासपोर्ट’) बनवायचे होते. त्याच्या मुलाखतीसाठी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच बोलावले होते. सर्वांनी मला सांगितले होते, ‘‘पारपत्र करण्यासाठी पूर्ण दिवस लागतो.’’ मी गुरुदेवांना सतत प्रार्थना करत होते, ‘मला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जायचे आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ दे.’ प्रार्थना केल्यामुळे माझे पारपत्राचे काम वेळेत पूर्ण होऊन मी गुरुपूजनाला वेळेत उपस्थित राहू शकले.’
२ ऊ. सौ. रंजना पालीवाल (वय ६१ वर्षे), जुन्नर, जिल्हा पुणे.
२ ऊ १. कार्यक्रमस्थळी पोचवणार्या वाहनचालकाला अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर त्याने अर्पण देणे : ‘आमचे घर गावापासून पुष्कळ दूर असल्याने आम्ही वैयक्तिक स्तरावर चारचाकी गाडी ठरवली. एका चालकाने अल्प व्ययात येण्याचे मान्य केले, तसेच कार्यक्रमस्थळी थांबण्याची सिद्धताही दर्शवली. मी चालकाला गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. मी त्यांना अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी अर्पण दिले.
२ ऊ २. ‘माझा मुलगा गुरुपौर्णिमा महोत्सवाला पूर्णवेळ थांबेल का ? मला कार्यक्रम ऐकता येईल का ?’, असे मला वाटत होते; पण त्याने शेवटपर्यंत थांबून कार्यक्रम पाहिला.’
२ ए. श्रीमती शुभदा जगदीश लोमटे (वय ६२ वर्षे), तळेगाव, पुणे.
१. ‘मी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराच्या सेवेला नियमितपणे जात होते. पहिले २ – ३ दिवस माझे पाय दुखले. तेव्हा घरातल्यांनी ‘प्रसाराला जाऊ नकोस’, असे मला सांगितले, तरीही मी प्रसाराला जात होते. त्यानंतर हळूहळू माझे पाय दुखायचे बंद झाले.
२. प्रसार करतांना लोकांनी प्रतिसाद दिला नाही की, आरंभी मला वाईट वाटायचे. हळूहळू साधकांच्या समवेत राहून मला वाईट वाटणे बंद झाले.
३. सेवेमुळे माझा उत्साह वाढला.
४. सेवेत असल्याने माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप आपोआप होत होता.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच प्रसारसेवेतून मला चैतन्य आणि आनंद अनुभवता आला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.७.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !