‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविधांगी कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमाचा महोत्सवाला उपस्थित साधक-श्रोते, साधक अन् संत वक्ते, तसेच नृत्य, गायन, स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करणारे यांच्यावर झालेले सकारात्मक परिणाम !

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी (१९.५.२०२५ या दिवशी) सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविधांगी कार्याबद्दल उपस्थितांना अवगत करण्यात आले. ‘हिंदु जनजागृति समिती’च्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  ‘या कार्यक्रमाचा महोत्सवाला उपस्थित साधक-श्रोत्यांवर आणि कार्यक्रमात विषय मांडणारे साधक अन् संत यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, तसेच ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके, नृत्य आणि कृतज्ञता गीत सादर करणार्‍यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

७ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/953923.html

शंखनाद महोत्सवातील व्यासपिठावरील स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांतील क्षण

१ इ. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, नृत्य आणि गायन या कार्यक्रमांचा ते सादर करणार्‍यांवर सकारात्मक परिणाम होणे : स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, नृत्य आणि गायन सादर करण्यापूर्वी काही साधक अन् साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती; पण त्यांनी कार्यक्रम सादर केल्यानंतर ती अल्प किंवा नाहीशी झाली आणि कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अधिक वाढली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ इ १. निष्कर्ष : स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ४ ते ११ मीटरने वाढ झाली. नृत्य आणि गायन सादर करणार्‍या साधिकांतील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ८ ते २१ मीटरने वाढ झाली. यातून ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, नृत्य आणि गायन या कार्यक्रमांचा ते सादर करणार्‍यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला’, असे लक्षात येते.

१ ई. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव स्वतः उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५३४५ किलोमीटर होती आणि कार्यक्रमानंतर ती ७३३२ किलोमीटर झाली; म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत १९८७ किलोमीटरने वाढ झाली. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : ‘सर्वांना चैतन्य आणि आनंद मिळावा’, यासाठी प्राणशक्ती न्यून असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पूर्ण वेळ महोत्सवातील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या चैतन्यमय उपस्थितीमुळे महोत्सवातील वातावरण अत्यंत चैतन्यमय बनले. कार्यक्रमाच्या आरंभी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने देश-विदेशात चालू असलेले विविधांगी कार्य’ याबद्दल सर्वांना अवगत करण्यात आले. गुरुदेवांच्या कृपेने चालू असलेले अतुलनीय अन् उत्तुंग कार्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित देश-विदेशातील साधक, साधिका, संत, सद्गुरु, धर्मप्रेमी, हितचिंतक, निमंत्रित संत आणि मान्यवर या सर्वांचा भाव जागृत झाला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अत्यंत भावपूर्णरित्या औक्षण केले. सनातनच्या तीनही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) उपस्थितीमुळे वातावरणात उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ‘संगीत विभागा’तील साधिकांनी सादर केलेले ‘गुरुमहिमा संकीर्तन’ नृत्य आणि कृतज्ञता गीत यांमुळे सर्वांचा कृतज्ञताभाव जागृत झाला. एकूणच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले.

सौ. मधुरा कर्वे

२ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे प्रयोगातील साधक अन् साधिका यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : महोत्सवातील कार्यक्रमातून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते. प्रयोगातील आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे विविध पातळीचे साधक अन् साधिका यांनी त्यांची क्षमता अन् भाव यांनुसार चैतन्य ग्रहण केले. या कार्यक्रमानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने ४० ते ५० मीटरने वाढली. यातून ‘सर्वांनाच कार्यक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ प्रमाणात लाभ झाला’, असे लक्षात येते.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविधांगी कार्यदर्शन या संदर्भात महोत्सवात विषय मांडणारे साधक आणि संत वक्ते यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने हिंदु जनजागृती समिती, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय अशा विविध संस्थांची स्थापना झाली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अनेक साधक आणि साधिका साधनारत आहेत. ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सनातन संस्थेचे धर्मसंस्थापनात्मक कार्य याविषयी अवगत केले. ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनिल घनवट यांनी समितीच्या वतीने देशभरात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या संदर्भात चालू असलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य श्री. शॉन क्लार्क यांनी आध्यात्मिक संशोधन-कार्य यासंबंधी अवगत केले. ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे मार्गदर्शक सद्गुरु सिरियाक वाले यांनी विदेशात चालू असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याची माहिती दिली. महोत्सवात विषय मांडतांना श्री. सुनिल घनवट अन् श्री. शॉन क्लार्क यांच्याकडून प्रामुख्याने भावाची स्पंदने आणि सद्गुरु नंदकुमार जाधव अन् सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून प्रामुख्याने चैतन्य अन् आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित झाली. साधक आणि संत वक्ते यांनी त्यांचे विषय भावपूर्ण मांडल्याने त्यांना पुष्कळ चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांना ‘स्वतःतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे’, असा आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला.

२ ई. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणार्‍यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे साधक आणि साधिका यांनी प्रत्येक प्रसंग उत्कृष्टपणे सादर केला. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये क्षात्रभाव जागृत झाला आणि सर्वांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात आले. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करणारे साधक आणि साधिका यांची यातून समष्टी साधना झाली. त्यामुळे त्यांना चैतन्य मिळून ‘स्वतःतील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी होणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे’, असा आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला.

२ उ. नृत्य आणि गायन सेवा करणार्‍या साधिकांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ‘संगीत विभागा’तील साधिकांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ हा दृष्टीकोन ठेवून त्यांच्यातील कलेचा उपयोग त्यांच्या ‘साधने’साठी केला आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवात नृत्य आणि गायन सेवा करायला मिळणे, हे परमभाग्याचे आहे’, असा या साधिकांचा भाव आहे. नृत्य आणि गायन यांचा सराव करतांना, तसेच व्यासपिठावर ते प्रत्यक्ष सादर करतांना साधिकांना आध्यात्मिक अनुभूती आल्या. साधिकांनी गुरुदेवांच्या चरणी अत्यंत कृतज्ञताभावाने अर्पण केलेले नृत्य आणि गायन सेवा यांतून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित झाली. साधिकांना या सेवेतून चैतन्य मिळून ‘स्वतःतील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे’ असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

२ ऊ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे अध्यात्मातील अत्युच्च स्थितीला पोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मुळातच पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. १७ ते १९ मे २०२५ या कालावधी सनातन संस्थेने आयोजित केलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ म्हणजे भव्य-दिव्य अलौकिक सोहळा होता. प्राणशक्ती न्यून असतांनाही गुरुदेव सलग तिन्ही दिवस या महोत्सवाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुदेवांनी देश-विदेशातील साधक, संत, सद्गुरु, धर्मप्रेमी, तसेच निरपेक्षपणे कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ यांना एकत्र आणून विश्वाला जणू सनातन राष्ट्राची स्थापना करण्याचे आध्यात्मिक बळ दाखवून दिले. कार्यक्रमापूर्वी गुरुदेवांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५३४५ किलोमीटर होती आणि कार्यक्रमानंतर ती ७३३२ किलोमीटर झाली, म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ झाली. याचे कारण हे की, गुरुदेवांमधील चैतन्य समष्टीसाठी पुष्कळ मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले. यातून गुरुदेवांचे अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात येते. तसेच ‘संतांचा जन्मोत्सव साजरा करणे आध्यात्मिकदृष्ट्या किती लाभदायी आहे’, हेही लक्षात येते. या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा साधकांना सेवेची संधी देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५)

ई-मेल : [email protected]