पुजार्यांना रोख रक्कम किंवा ऑनलाईन रक्कम स्वीकारण्यास मनाई !

सोनई (जिल्हा अहिल्यानगर) – शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मासिक मानधन तत्त्वावर ६ अधिकृत पुजारी यांची निवड केली आहे. त्यांना दक्षिणा मिळणार नाही. शनिदेवाला अभिषेक, पूजन करण्यासाठी देवस्थानाची १०० रुपयांची पावती घेणे आवश्यक आहे. याची कार्यवाही ६ सप्टेंबरपासून चालू झाल्याची माहिती ‘शनिशिंगणापूर देवस्थान’चे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली आहे. मानधन तत्त्वावर घेण्यात आलेल्या पुजार्यांना मासिक ३१ सहस्र आणि २१ सहस्र रुपये मिळणार आहेत. पहाटे ४ ते रात्री १०.३० या कालावधीत २ पाळ्यांमध्ये पुजार्यांनी सेवा द्यायची आहे.
पुजारी सेवा देत असतांना त्यांनी भ्रमणभाष वापरू नये, भक्तांकडून रोख अथवा ऑनलाईन स्वरूपात रक्कम स्वीकारू नये, तसेच भाविकांना देणगी रक्कम ही दानपात्रात टाकण्याच्या संबंधी मार्गदर्शन करावे, असेही सांगण्यात आले.
काही भाविक पुजार्यास वस्तू स्वरूपात दान देणार असतील, तर त्या वस्तू पुजार्यांनी न स्वीकारता देवस्थानाच्या देणगी विभागाकडे जमा करून त्याची रितसर पावती घेण्यासाठी भाविकांना सांगावे. १ सहस्र रुपयांपुढील देणगीदारांकडून अभिषेकासाठी देवस्थानाचे अभिषेक शुल्क आकारले जाणार नाही. तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांना अभिषेकासाठी देवस्थानाचे शुल्क आकारले जाणार नाही.
शनि देवाच्या हवनासाठी पूजेचे सामान, पुजारी दक्षिणा आणि देवस्थानाकडील शुल्क मिळून ११ सहस्र रुपयांची पावती भाविकांना घ्यावी लागेल. त्यातील पूजेचे साहित्य आणि दक्षिणा म्हणून ५ सहस्र रुपये पुजार्यास देवस्थानाकडून स्वतंत्रपणे दिले जातील.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !