फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील नेदुमन्नूर एल्.पी. शाळेच्या आवारात झालेल्या गणपति होमाला आक्षेप घेतला. धर्माच्या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) पुन्हा एकदा स्वतःचा ढोंगीपणा दाखवून दिला आहे. केरळ राज्यातील सत्ताधारी पक्षाने हे स्पष्ट केले आहे की, तेथे हिंदु धर्म आणि इस्लाम धर्म यांच्या अनुयायांना वागवतांना भेदभाव केला जातो. अलीकडेच केरळचे माजी गृहमंत्री कोडियेरी बालकृष्णन् यांचा मुलगा असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बिनेश कोडियेरी यांनी ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केली होता. या चित्रफीतीमध्ये टोपी घातलेला एक माणूस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात नमाज पढतांना दिसत आहे.

१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मुसलमानप्रेमाचा उमाळा !
‘एक्स’ वापरकर्ता आनंद यांच्या म्हणण्यानुसार, हा माणूस कोल्लम येथील फेरीवाला असून तो उपजीविकेसाठी पलंगपोस (बेडशीट) विकतो. बाहेर पाऊस पडत असल्याने मुसलमानाने स्थानिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे नमाज पढण्यासाठी जागा मागितली होती. पक्षाने त्याला कार्यालयातील जागेची अनुमती दिली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बिनेश कोडियेरी यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘‘जेव्हा एखादा माणूस पावसात भिजून आपल्या श्रद्धेला धरून प्रार्थना करण्यासाठी जागा मागतो, तेव्हा राजकीय पक्षाचे कार्यालय त्याच्यासाठी ती सिद्ध करते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या श्रद्धेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही संस्था लोकांची श्रद्धा आणि चांगूलपणा यांचे रक्षण करणारी आहे. प्रेम आणि बंधुता ही आपल्या राज्याची सर्वांत मोठी शक्ती आहे.’’ मुसलमानाला आपल्या कार्यालयात नमाज पढण्याची अनुमती देण्याच्या निर्णयाचे ‘प्रेम आणि बंधुभाव’ असे वर्णन पक्षाने केले. योगायोगाने, पक्षाचा हिंदूंच्या संदर्भात असा सुसंवादी दृष्टीकोन, सहिष्णुता आणि अनुकूल वृत्ती दिसून येत नाही.
२. हिंदूंचे धार्मिक विधी थांबवणारी मार्क्सवाद्यांची हिंदुद्वेषी मानसिकता
फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील नेदुमन्नूर एल्.पी. शाळेच्या आवारात झालेल्या गणपति होमाला आक्षेप घेतला. या पक्षातील गुंडांना स्थानिकांकडून होमाची माहिती मिळाली आणि त्यांनी होम थांबवला. होमाच्या आयोजकांवरही आक्रमण केले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आयोजकांना अटक केली. पक्षाच्या गुंडांनी शाळेच्या ठिकाणी निषेध मोर्चा काढला. शाळा अधिकार्यांच्या पूर्वानुमतीने पूजा आयोजित करण्यात आली होती, हे वास्तव असूनही असे घडले. परंपरेनुसार प्रतिवर्षी महानवमीच्या दिवशी पूजा केली जाते; पण हा कार्यक्रम रहित झाल्यामुळे शाळेने गणपति होम आयोजित केला; परंतु यामुळे असहिष्णु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हिंदूंना त्यांच्या धर्माच्या अधिकाराचा वापर करण्यापासून रोखू शकला नाही.
३. ज्योतिषाला भेटणार्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याची चौकशी !
ऑगस्ट २०२५ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव एम्. व्ही. गोविंदन् यांनी महाव पोदुवल नावाच्या हिंदु ज्योतिषाला भेट दिल्याविषयी त्यांची चौकशी करण्यात आली. ‘ज्योतिषशास्त्रा’वर चर्चा केल्याविषयी त्यांना पक्षाच्या टिकेचा सामना करावा लागला. ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आणि चहा प्यायला आले होते’, असे स्पष्टीकरण ज्योतिषाला द्यावे लागले. ‘या भेटीच्या काळात त्यांनी ज्योतिषशास्त्राविषयी काहीही चर्चा केली नाही’, असे महाव पोडवाल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘वैयक्तिक संबंध ज्योतिषशास्त्रासमवेत मिसळू नका. ‘गोविंदन् गुरूंनी त्यांचे ज्योतिष तपासले’, असे कुणी म्हटले, तर ते मला सहन होणार नाही.’’ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्याचे पोदुवाल यांनी निदर्शनास आणून दिले.
४. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हिंदु धर्माविषयीच्या प्रत्येक गोष्टीला आक्षेप
जुलै २०२२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) राष्ट्रीय चिन्हाच्या अनावरणाच्या काळात पूजा आयोजित करण्यावर आक्षेप घेतला. नेपाळमधील जगातील एकमेव हिंदु राजेशाही हटवण्यातही या पक्षाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
५. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हिंदुविरोधी प्रचार
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या ६४ पानांच्या राजकीय ठरावाच्या मसुद्यात हिंदुविरोधी प्रचाराचा कसा अवलंब केला, याचा अहवाल ‘ऑप इंडिया’ने फेब्रुवारी २०२५ मध्ये दिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय ठरावातील मसुद्याच्या १८ व्या पानावर, पक्षाने पूर्वीच्या नेपाळच्या ‘हिंदु राष्ट्र’मध्ये हिंदु शक्तींच्या उदयाविरुद्ध उन्मादी कटकारस्थान केले. आपल्या कुत्सित हिंदुविरोधी हेतूचा एक भाग म्हणून ‘राजेशाही समर्थक शक्ती पुन्हा एकदा लोकांमध्ये मान्यता मिळवण्यासाठी आणि पर्यायी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी लोकप्रिय असंतोषाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घटक या शक्तींना सक्रीयपणे पाठिंबा देत आहेत. ‘नव्याने स्वीकारलेली धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत’, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला.
६. राममंदिराला हिंदुत्वाच्या मोहिमेचा आक्रमक पाठपुरावा म्हणणारा पक्ष
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाला ‘हिंदुत्वाच्या मोहिमेचा आक्रमक पाठपुरावा’ असे म्हटले. इस्लामी हुकूमशहांनी बांधलेल्या वादग्रस्त बांधकामांच्या अधीन असलेल्या हिंदु धार्मिक स्थळांच्या पुनर्संचयनाच्या मागण्यांनाही त्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला.
‘जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन हा राज्यपुरस्कृत कार्यक्रम झाला, ज्यात पंतप्रधान स्वतः धार्मिक विधी पार पाडत होते. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील ईदगाह येथे हिंदु मंदिरे अस्तित्वात असल्याचा दावा करून या दोन ठिकाणी कायदेशीर वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्य करणे, हे पुढचे पाऊल आहे. मंदिर बांधण्यासाठी अयोध्या, काशी आणि मथुरा या ३ जागा हिंदूंच्या कह्यात द्याव्यात, हा विहिंपचा मूळ नारा होता’, असे मत व्यक्त करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्वतःची हिंदुविरोधी मानसिकता स्पष्ट केली.
७. ‘हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी हिंदू अल्पसंख्यांक भागात चिथावणीखोर कृत्ये करतात’, असा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दावा !
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘मुस्लिम स्ट्रीट व्हेटो’च्या कल्पनेला बळकटी देण्याचा अवलंब केला. त्यामुळे रस्ते आणि क्षेत्रे उर्वरित लोकसंख्येसाठी अन् विशेषतः हिंदूंसाठी दुर्गम बनतात. ‘हिंदु समुदायाने अल्पसंख्यांक भागात पूजा आणि चिथावणीखोर कृत्ये केली’, असा आरोप त्यांनी केला. ‘रामनवमी, हनुमान जयंती आणि गणेश पूजा यांसारख्या सणांमध्ये धार्मिक मिरवणुका काढणे, अल्पसंख्यांक भागात प्रवेश करणे आणि चिथावणीखोर कृत्ये करून संघर्ष घडवून आणणे, ही नित्याची गोष्ट झाली आहे. या सर्व घटनांमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या सदस्यांनाच पोलिसांच्या दडपशाहीला सामोरे जावे लागते’, असा दावा करण्यात आला आहे. हिंदु महिलांना मुसलमान पुरुषांकडून लग्नाच्या बहाण्याने धर्मांतराचे आमीष दाखवण्यापासून संरक्षण देणार्या ‘ग्रुमिंग जिहाद’ (लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे) सारख्या कायद्यांच्या कार्यवाहीवरही पक्षाने आक्षेप घेतला. सुवार्तिक गटांनी आदिवासींच्या हिंसक धर्मांतरांवर केलेल्या दडपशाहीवरही त्यांनी आक्षेप घेतला.
८. हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडवून इतिहासाला ‘पौराणिक कथा’ म्हणून मांडण्याचा कम्युनिस्टांचा प्रयत्न
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिंदुविरोधी पार्श्वभूमी उघड केली. त्याने दावा केला, ‘नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी हिंदु धार्मिक विधींसह केले. सभापतींच्या आसंदीच्या मागे एक ‘सेंगोल’ (राजदंड) ठेवला होता.’ या पक्षाने हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडवणे चालू ठेवले आणि आपल्या इतिहासाला ‘पौराणिक कथा’ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यमे यांवर हिंदूंच्या सकारात्मक सादरीकरणावरही त्यांनी आक्षेप घेतला. प्रस्तावाच्या मसुद्यातील पान ४१ वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या घटकांसह सांस्कृतिक आणि संशोधन संस्थांमध्ये घुसखोरी करून त्यांची पकड वाढवली आहे. ते सांप्रदायिक दृष्टीकोनातून भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा आणि पौराणिक कथांना वास्तविक इतिहास म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
मंदिरात प्रार्थना केल्याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पक्षाच्या नेत्याला फटकारले !

सप्टेंबर २०१७ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांचे मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांना त्रिशूर येथील प्राचीन श्री गुरुवायूर मंदिराला भेट दिल्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यावरून पुष्पांजली अर्पण केल्याविषयी फटकारले. त्याला मुंडू आणि मेलमुंडूमध्ये गुंडाळण्यात आले होते. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये ते चंदनकुरी (चंदनाचा गंध) परिधान करतांना दिसले होते. सुरेंद्रनची मुले भगवान श्रीकृष्णाच्या वेशात होती. त्या वेळी ते केरळचे देवस्वोम मंत्री होते. या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचे वर्तन पक्षाच्या तत्त्वांनुसार नव्हते, असे पक्षाच्या अंतर्गत समितीने घोषित केले. केवळ कडकंपल्ली सुरेंद्रन् यांच्या मंदिर भेटीच्या आधारे चौकशी अहवालही सादर करण्यात आला. पक्षाच्या समितीने घोषित केले की, श्री गुरुवायूर मंदिरात पूजा करणे, हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यांनी कडकमपल्ली सुरेंद्रन यांना पक्षाच्या इतर नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे निर्देश दिले.
(साभार : ‘ऑप इंडिया’चे संकेतस्थळ)
९. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांकडून सनातन धर्म आणि मनुवाद यांच्या निर्मूलनाविषयी आवाहन !
हिंदुत्वाचा सांप्रदायिक अजेंडा (कार्यसूची) जोपर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांच्या सामान्यज्ञानाचा भाग होत नाही, तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी लोकप्रिय संस्कृतीच्या माध्यमातून प्रसार करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे चित्रपट उद्योग, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ओ.टी.टी. (ओव्हर द टॉप) मंच, लोकप्रिय संगीत आणि अगदी अलीकडच्या काळातील उच्च कलेच्या क्षेत्रात घुसखोरी करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे त्यांचे अथक प्रयत्न आहेत.’’
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांचा हिंदुविरोधी अजेंडा स्पष्ट केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘सनातन धर्मा’ला ‘मनुवादा’च्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दोघांच्या निर्मूलनाच्या आवाहनाचे समर्थन केले होते. पक्षाने हिंदुत्वाचा प्रतिकार करण्यासाठी सैन्य जमवण्याचेही वचन दिले.
१०. ‘मुसलमानांचा कट्टरतावाद हिंदुत्वाच्या उदयामुळे झाला’, असे म्हणणारा कम्युनिस्ट पक्ष
कम्युनिस्ट पक्षाने जमात-ए-इस्लामी आणि एस्.डी.पी.आय. सारख्या कट्टरपंथी इस्लामी संघटनांचा ‘सांकेतिक निषेध’ केला; परंतु ‘त्यांचा कट्टरतावाद काही प्रमाणात हिंदुत्वाच्या उदयामुळे होतो’, असे त्वरित सूचित केले. ‘जमात-ए-इस्लामी’ आणि ‘एस्.डी.पी.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा) यांसारख्या मुसलमान कट्टरतावादी आणि अतिरेकी संघटना मुसलमानांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी काम करत आहेत. ते अल्पसंख्यांक समुदायातील अलिप्तता आणि भीती यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठ शक्तींनी सातत्याने आक्रमणे केली आहेत.
‘जरी अल्पसंख्यांक सांप्रदायिकतेची तुलना सत्तेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ सांप्रदायिक शक्तींशी केली जाऊ शकत नसली, तरी हे समजून घेतले पाहिजे की, अतिरेकी अल्पसंख्यांक कारवाया केवळ बहुसंख्य सांप्रदायिक शक्तींना बळकट करतात’, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला.
(साभार : ‘ऑप इंडिया’चे संकेतस्थळ)
संपादकीय भूमिकासाम्यवाद्यांचे हिंदुविरोधी धोरण पहाता भारतीय राजकारणासह देशातून त्यांचे अस्तित्व नष्ट करणे आवश्यक ! |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप